Siddharth Jadhav : सलग प्रयोगांसह ‘ॲनिमल’ रंगमंचावर; सिद्धार्थ जाधव दुहेरी भूमिकेत

Siddharth Jadhav : सलग प्रयोगांसह ‘ॲनिमल’ रंगमंचावर; सिद्धार्थ जाधव दुहेरी भूमिकेत

0
Siddharth Jadhav : सलग प्रयोगांसह ‘ॲनिमल’ रंगमंचावर; सिद्धार्थ जाधव दुहेरी भूमिकेत
Siddharth Jadhav : सलग प्रयोगांसह ‘ॲनिमल’ रंगमंचावर; सिद्धार्थ जाधव दुहेरी भूमिकेत

Siddharth Jadhav : मराठी रंगभूमीवर (Marathi Theatre) नव्या नाटकांची चाहूल लागलेली असतानाच ‘ॲनिमल’ (Theatre Performance: Animal) या नाटकाने आणखी एक वेगळी चर्चा रंगवली आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) आठ वर्षांनंतर रंगमंचावर पुनरागमन करत असून या वेळी त्यांचा प्रवास केवळ एका प्रयोगापुरता मर्यादित नसून सलग प्रयोगांच्या मालिकेतून प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. ठाणे, बोरीवली, वाशी, दादर, पार्ले आणि मुलुंड अशा विविध नाट्यगृहांमध्ये ‘ॲनिमल’चे सलग प्रयोग सादर होणार असल्याने या नाटकाकडे रंगभूमीप्रेमींचे विशेष लक्ष लागले आहे.

नक्की वाचा : ‘बैटल ऑफ गलवान’चा नवा अवतार; सलमान खानचा चित्रपट आता ‘मातृभूमी’ नावाने येणार

हे नाटक महेश मांजरेकर लिखित आणि दिग्दर्शित

‘ॲनिमल’ हे नाटक महेश मांजरेकर लिखित आणि दिग्दर्शित असून सिद्धार्थ जाधव या प्रयोगात दुहेरी भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे ते या नाटकाचे निर्मातेही आहेत. आई-वडिलांच्या स्मरणार्थ सुरू केलेल्या ‘ताराराम’ या निर्मिती संस्थेची ही पहिली निर्मिती असून, या नाटकातून त्या संस्थेचा रंगभूमीवरील प्रवास सुरू होत आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

व्यक्तीच्या मनात चालणारी झुंज रंगमंचावर (Siddharth Jadhav)

नाटकाची कथा दत्तू या तरुणाभोवती फिरते. छोट्या गावातून मुंबईत आलेला हा तरुण अभिनेता होण्याचं स्वप्न पाहतो. मात्र शहरातील स्पर्धा, अस्थिरता, नात्यांमधील अंतर आणि मानसिक ताण यांच्या घुसमटीत त्याचा प्रवास अधिक गुंतागुंतीचा होत जातो. एका व्यक्तीच्या मनात चालणारी ही झुंज रंगमंचावर एकपात्री शैलीत साकारली जाणार आहे.

सिद्धार्थ जाधव यांच्यासाठीही हा प्रयोग विशेष ठरणार आहे. ते म्हणतात, “हे नाटक मला कलाकार म्हणून नव्याने तपासतं. प्रत्येक प्रयोगासोबत हा प्रवास अधिक खोल होत जातो. सलग वेगवेगळ्या रंगमंचांवर प्रेक्षकांसमोर उभं राहणं म्हणजे प्रत्येक वेळी नवा अनुभव जगण्यासारखं आहे.”

सध्या ‘ॲनिमल’च्या तालमी जोरात सुरू असून येत्या काही दिवसांत ठाण्याच्या गडकरी रंगायतनपासून या प्रयोगांची सुरुवात होणार आहे. त्यानंतर बोरीवली, वाशी, दादर, पार्ले आणि मुलुंड येथे सलग प्रयोग रंगणार आहेत. स्वतः महेश मांजरेकर यांनी या नाटकाला संगीत दिले असून, एकपात्री मांडणी आणि सिद्धार्थ जाधव यांचे रंगमंचावरील पुनरागमन यामुळे ‘ॲनिमल’च्या या प्रयोगमालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढताना दिसत आहे.