Sikh Punjabi community : श्रीरामपूर : राज्य सरकारने (State Govt) नांदेडच्या गुरुद्वारासाठीच्या ‘तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा अधिनियम’ला मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet meeting) मान्यता दिली आहे. श्रीरामपूर येथील सिख पंजाबी समाजाने (Sikh Punjabi community) या निर्णयाचा निषेध करून सदर निर्णय तात्काळ रद्द करावा, अशा आशयाचे निवेदन प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांना दिले आले.
नक्की वाचा : मनोज जरांगेंचा मुंबईत पुन्हा आंदोलनाचा इशारा
निर्णयाचा निषेध (Sikh Punjabi community)
गुरुद्वारा श्री गुरु सभा सिख पंजाबी समाजाच्यावतीने प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारने नांदेडच्या गुरुद्वारासाठी तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा अधिनियम नांदेड येथील गुरुद्वारासाठी तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा अधिनियम २०२४ लागू करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या विधेयकाचे प्रारूप मान्य झाल्यानंतर दि नांदेड शीख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब निवडणूक नियम व त्याचे उपविधी तयार करण्यात येतील. गुरुद्वाराच्या १९५६ च्या अधिनियमात सुधारणा करण्यासाठी न्या. जे. एच. भाटीया अभ्यास समिती नियुक्त करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयीन प्रकरणांच्या पार्श्वभुमीवर आणि अभ्यास समितीच्या शिफारशी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
हे देखील वाचा: नारायण राणेंना भाजपने त्यांची जागा दाखवली – विनायक राऊत
धार्मिक भावना दुखावण्याचा प्रकार (Sikh Punjabi community)
सदर निर्णय घेताना समाजातील प्रतिनिधींना विश्वासात घेण्यात आलेले नाही. राज्य सरकारकडून नेमण्यात येणारे प्रतिनिधी हे या ठिकाणी आल्यास त्यांना तख्त नांदेड येथील मर्यादा माहित नसतील आणि त्यामुळे त्या ठिकाणी धार्मिक भावना दुखावण्याचा प्रकार होण्याची शक्यता आहे. सदर निर्णय हा अन्यायकारक असून अल्पसंख्याक समाजाच्या धार्मिक संस्थेत दखल घेण्यासाठी घेण्यात आलेला आहे.त्यामुळे हा निर्णय लगेच रद्द करण्यात यावा तसेच येत्या काळात समाजासंदर्भात किंवा समाजाच्या वास्तु संदर्भात कुठलेही निर्णय घेताना समाजातील लोकांना विधासात घेण्यात यावे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.यावेळी गुरुबचन सिंग चुग, लकी सेठी, सरबजितसिंग सेठी, गुलशन कंत्रोड, रिम्पी चुग, तेजेंद्रसिंग सेठी, तमन भटियानी, हिरासिंग भटियानी, अमरकसिंग चुग, अमरप्रीतसिंग सेठी ,बंटीसेठ गुरुवाडा,प्रीतीपालसिंग बतरा,मोहनसिंग कथुरिया,अमरमितसिंग चुग, मनजीतसिंग चुग,जसबीरसिंग चुग,अमरमितसिंग गुरुवाडा,गुरुमितसिंग ठकराल,श्रीकृष्ण बडाख,मनजितसिंग चुग आदींसह सिख समाजातील बांधव यावेळी उपस्थित होते.