Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधांसाठी‌ प्रस्ताव सादर करा : डॉ. पंकज आशिया

Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधांसाठी‌ प्रस्ताव सादर करा : डॉ. पंकज आशिया

0

Simhastha Kumbh Mela : नगर : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) पार्श्वभूमीवर शिर्डी (Shirdi)शनिशिंगणापूर (Shani Shingnapur) येथे निर्माण करण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांसाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक निधीसह प्रस्ताव प्राधान्याने सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Pankaj Ashiya) यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने जिल्हा कार्यकारी समितीच्या आढावा बैठक आयोजियत करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

नक्की वाचा : चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत देवेंद्र फडणवीस सरकारचे १० मोठे निर्णय

संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित

यावेळी अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे हे प्रत्यक्ष तर संबंधित यंत्रणेचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

अवश्य वाचा : देवेंद्र फडणवीसांचा संतोष देशमुखांच्या लेकीला फोन; बारावी उत्तीर्ण झाल्याबद्दल केलं अभिनंदन

जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, (Simhastha Kumbh Mela)

उत्तर प्रदेशात कुंभ निमित्ताने धार्मिक पर्यटनात वाढ झाली आहे. त्यामुळे नाशिक सोबत जिल्ह्यातील शिर्डी व शनिशिंगणापूर  येथील धार्मिक पर्यटनाला चालना देण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. त्यादृष्टीने धार्मिक स्थळांना जोडणारी वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी रेल्वेस्थानक, रस्ते, विमानतळ सुविधांच्या सुधारणेवर भर द्यावा. या ठिकाणच्या कामांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्यात यावेत.

पर्यटकांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी आवश्यक सुविधांची निर्मिती करावी. आरोग्य सुविधा, सुरक्षा विषयक उपाययोजना, स्वच्छतागृह, प्रमुख रस्ते, परिसर सुशोभीकरण, पोलीस मदत केंद्रे आदी व्यवस्थेचे नियोजन करावे. शिर्डी येथे वाहनांची गर्दी न होता वाहतूक सुरळीत होण्यासाठी पर्यायी रस्त्यांची निर्मिती, बाह्यवळण रस्त्यांसाठी चाचपणी करावी.