Sina River : सीना नदीवरील बुडीत बंधारे सर्वेक्षणास प्रशासकीय मान्यता!

Sina River : सीना नदीवरील बुडीत बंधारे सर्वेक्षणास प्रशासकीय मान्यता!

0
Sina River : सीना नदीवरील बुडीत बंधारे सर्वेक्षणास प्रशासकीय मान्यता!
Sina River : सीना नदीवरील बुडीत बंधारे सर्वेक्षणास प्रशासकीय मान्यता!

Sina River : नगर : जलसंपदा विभागाने सीना नदीवरील (Sina River) दोन बुडीत बंधारे बांधणीसाठी ५० कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे सविस्तर बंधारे सर्वेक्षण करण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. या सर्वेक्षणासाठी २१.१३ लाख खर्च मंजूर असून, तो महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळामार्फत (Maharashtra Krishna Valley Development Corporation) केला जाणार आहे. यामुळे नदीपात्राचे सौंदर्यवर्धन होईल व पाणी साठा वाढून परिसराला दीर्घकालीन सिंचन व पाणीपुरवठ्याचा (Water Supply) लाभ मिळेल.

नक्की वाचा : भंडारदराला जाण्यासाठीच्या वाहतुकीत बदल

सीना नदी सुशोभीकरण व शुद्धीकरण

महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त श्री क्षेत्र चौंडी (ता. जामखेड, जिल्हा अहिल्यानगर) येथे सुमारे १ हजार २०९ कोटींचा बृहद विकास आराखडा मंजूर केला आहे. या आराखड्यात चौंडी परिसरातील ऐतिहासिक व पौराणिक स्मृतीस्थळांचे जतन, पायाभूत सुविधा उभारणी, सीना नदी सुशोभीकरण व शुद्धीकरण, तसेच दोन बुडीत बंधारे बांधणीचा समावेश आहे.

अवश्य वाचा : महाराष्ट्रात होणार १५ हजार पोलिसांची भरती

प्रा. राम शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा (Sina River)

६ मे २०२५ रोजी श्री क्षेत्र चौंडी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत “श्री क्षेत्र चौंडी बृहद विकास आराखड्यास” मंजुरी देण्यात आली. विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे एकूण सुमारे बाराशे कोटी रुपयांचा आराखडा शासन दरबारी मंजूर झाला. यामध्ये सीना नदी सुशोभीकरण, नदीपात्र स्वच्छता, शुद्धीकरण व दोन बुडीत बंधारे प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे.

“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला साजेशी अशी चौंडी विकास आराखड्याची अंमलबजावणी होईल व सीना नदीवरील बुडीत बंधारे प्रकल्पामुळे या भागाचा सर्वांगीण विकास साधला जाईल.
प्रा. राम शिंदे, सभापती, विधान परिषद.