नगर : प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर बॉलीवूड अभिनेता आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा (Aamir Khan) नवा चित्रपट “सितारे जमीन पर” (Sitaare Zameen Par Movie) अखेर २० जून २०२५ रोजी देशभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित (Release) झाला आहे. याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या क्लासिक “तारे जमीन पर”चा स्पिरिचुअल सिक्वेल मानला जात आहे. त्याची कथा प्रेरणादायक आणि हृदयस्पर्शी आहे.
नक्की वाचा : ‘आळंदीमध्ये कत्तलखाना होऊ देणार नाही’ – देवेंद्र फडणवीस
‘सितारे जमीन पर’ चित्रपटाचे ओपनिंग कलेक्शन किती ? (Sitaare Zameen Par Movie)
चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी देशभरातून प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटाचे ११.७ कोटींचे ओपनिंग डे कलेक्शन नोंदवण्यात आले आहे. सकारात्मक प्रतिक्रिया, तोंडी प्रसार आणि सोशल मीडियावरील चर्चेमुळे चित्रपटाविषयी उत्सुकता अधिकच वाढली आहे. वीकेंड जवळ येत असताना, या कमाईत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.
अवश्य वाचा : अभिनेत्री दीपा परब झळकणार ‘फकिरीयत’ या हिंदी चित्रपटात
‘सितारे जमीन पर’ मधील कलाकार (Sitaare Zameen Par Movie)
या चित्रपटात आमिर खानसोबत अभिनेत्री जेनेलिया देशमुख प्रमुख भूमिकेत आहे. आरएस प्रसन्ना दिग्दर्शित आणि आमिर खान प्रॉडक्शन निर्मित, ‘सितारे जमीन पर’मध्ये १० नवोदित कलाकारांचे भव्य पदार्पण होत आहे. हे कलाकार म्हणजे अरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, सम्वित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषि शाहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर. या नव्या चेहऱ्यांनी चित्रपटाच्या उत्सवाला अधिकच रंगत आणली आहे.