Akola Molesting Case:धक्कादायक!अकोल्यातील शिक्षकाकडून सहा मुलींचा विनयभंग  

0
Akola Molesting Case:धक्कादायक!अकोल्यातील शिक्षकाकडून सहा मुलींचा विनयभंग  
Akola Molesting Case:धक्कादायक!अकोल्यातील शिक्षकाकडून सहा मुलींचा विनयभंग  

नगर : बदलापूरमधील (Badalapur) लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण देश हादरलेला असताना अकोल्यातून आणखी एक अशीच घटना समोर आली आहे.अकोल्यात (Akola) एका शालेय शिक्षकाने सहा अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग (Molestation) केला आहे.या प्रकरणी पीडित मुलींच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

नक्की वाचा : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय,हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी

अश्लील व्हिडिओ दाखवत शिक्षकाकडून मुलींचा विनयभंग (Akola Molesting Case)

अकोला जिल्ह्यातील या ४२ वर्षीय आरोपीचे नाव प्रमोद सरदार असे आहे. मागील चार महिन्यांत आठवीच्या सहा विद्यार्थिनींचा वारंवार विनयभंग केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आलीय. धक्कादायक बाब म्हणजे हा शिक्षक या मुलींना आधी अश्लील व्हिडीओ दाखवायचा आणि त्यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा. मिळालेल्या माहितीनुसार, अकोला शहरापासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या काझीखेडा गावातील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात हा अत्याचार झाला. पीडितांपैकी एकाने १०९८ या चाइल्ड हेल्पलाइनवर कॉल करण्याचे धाडस दाखविल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या तक्रारीमुळे बालकल्याण समितीने या प्रकरणाची चौकशी केली.

अवश्य वाचा : धक्कादायक!बदलापूरच्या शाळेत चार वर्षांच्या चिमुकल्यांवर अत्याचार  

आरोपीविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल (Akola Molesting Case)

बालकल्याण समितीच्या सदस्यांनी मंगळवारी(ता.२०) विद्यार्थ्यांसोबत तासभर सत्र आयोजित करण्याच्या बहाण्याने शाळेला भेट दिली. त्यांनी इयत्ता आठवीच्या वर्गातील मुलींशी वैयक्तिकरित्या संवाद साधला.यावेळी पीडित मुलींनी गेल्या चार महिन्यांपासून त्यांनी सहन केलेल्या त्रासाची माहिती दिली. मुलींचे म्हणणे ऐकून सदस्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला. उरल पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोपाल ढोले यांनी लगेच अल्पवयीन मुलींचे जबाब नोंदवण्यासाठी पोलीस पथक शाळेत पाठवले. पोलिसांनी तातडीने आरोपीविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. महिला आयोगाच्या माजी सदस्या आशा मिरजे यांनी या घटनेचा निषेध करत आरोपी शिक्षकावर कडक कारवाईची मागणी केली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here