Smriti Mandhana:ठरलं तर मग! स्मृती मानधना लवकरच अडकणार लग्नबंधनात

0
Smriti Mandhana:ठरलं तर मग! स्मृती मानधना लवकरच अडकणार लग्नबंधनात
Smriti Mandhana:ठरलं तर मग! स्मृती मानधना लवकरच अडकणार लग्नबंधनात

नगर : भारताची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना (Smriti Mandhana) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. संगीत दिग्दर्शक आणि फिल्ममेकर पलाश मुच्छल (Palash Muchhal) याच्यासोबत ती लग्नगाठ (Wedding) बांधणार असल्याचे बोललं जात आहे. पलाशने स्वतः इंदूरमध्ये पत्रकारांना ही माहिती दिली आहे.दोघांच्याही घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार असून, २० नोव्हेंबरपासून लग्नसमारंभाला सुरुवात होईल. हा विवाह स्मृतीच्या घरी म्हणजेच सांगलीत होणार असल्याचीही माहिती आहे.

नक्की वाचा: राज ठाकरेंचा ‘सत्याचा मोर्चा’ नेमका कशासाठी ?  

सांगलीकर आहे स्मृती (Smriti Mandhana)

स्मृती मानधना वयाच्या अवघ्या दोन वर्षांची असल्यापासून सांगलीत राहत आहे. दोन वर्षाची होती तेव्हाच ती तिच्या कुटुंबासोबत सांगलीच्या माधवनगर या उपनगरात राहायला आली होती. तिचं शालेय शिक्षणही तिथेच पूर्ण झालं आहे. स्मृती मानधना ही भारतीय  क्रिकेटच्या मैदानातील क्वीन म्हणून ओळखली जाते.

अवश्य वाचा:  आंध्र प्रदेशातील वेंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी;९ जणांचा मृत्यू     

स्मृती होणार इंदोरची ‘सून’ ((Smriti Mandhana))

पलाश आणि स्मृती हे दोघे २०१९ पासून एकमेकांच्या संपर्कात आहेत. त्यांनी जुलै २०२४ मध्ये त्यांच्या नात्याला इंस्टाग्रामवर अधिकृत केलं होतं. काही दिवसांपूर्वीच पलाश आपल्या सिनेमाच्या प्रचारासाठी इंदोरला आला होता. त्यावेळी पलाशाला स्मृतीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्यानं ” स्मृती ही इंदौरची सून होणार आहे, हे मी निश्चितपणे सांगतो’, असं म्हटलं होतं.  तसेच पलाश मुच्छलची बहीण आणि गायिका पलक मुच्छलनं अलीकडंच पलाश आणि स्मृती लवकरच लग्न करू शकतात, असं म्हटलं होतं.