Snehalaya : पारनेरमध्ये बालविवाह प्रतिबंधासाठी ‘उडान’ प्रकल्पांतर्गत विशेष अभियान

Snehalaya : पारनेरमध्ये बालविवाह प्रतिबंधासाठी 'उडान' प्रकल्पांतर्गत विशेष अभियान

0
Snehalaya : पारनेरमध्ये बालविवाह प्रतिबंधासाठी 'उडान' प्रकल्पांतर्गत विशेष अभियान
Snehalaya : पारनेरमध्ये बालविवाह प्रतिबंधासाठी 'उडान' प्रकल्पांतर्गत विशेष अभियान

Snehalaya : पारनेर : चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीचे औचित्य साधून पारनेर शहरात बालविवाह (Child Marriage) प्रतिबंधक जनजागृती आणि सामाजिक उत्थानासाठी विशेष अभियान राबविण्यात आले. स्नेहालय (Snehalaya) संस्थेच्या ‘उडान’ (Udaan) प्रकल्पांतर्गत आयोजित अभियानाद्वारे बालविवाह रोखणे, शिक्षण, आरोग्य आणि पुनर्वसन या विषयांवर स्थानिकांना मार्गदर्शन करण्यात आले. आजच्या आधुनिक युगातही बालविवाहाची प्रथा समाजाला पोखरत आहे. ही प्रथा मुळापासून उखडून टाकण्यासाठी स्नेहालय संचलित ‘उडान’ प्रकल्पाने पुढाकार घेतला आहे. 

नक्की वाचा : श्रीगोंद्यात विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू

उपस्थितांना मार्गदर्शन

या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट केवळ बालविवाह रोखणे इतकेच मर्यादित नसून, पीडित मुलींचे शिक्षण, आरोग्य आणि त्यांना स्वावलंबी बनवणे हे देखील आहे. या प्रसंगी ‘उडान’ प्रकल्पाचे व्यवस्थापक प्रवीण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते भगवान गायकवाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. गायकवाड यांनी आपल्या भाषणात बालविवाहाचे शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम स्पष्ट केले. ते म्हणाले की, “बालविवाह हा केवळ कायदा मोडणारा गुन्हा नसून, तो एका बालकाचे भविष्य अंधकारात ढकलणारा प्रकार आहे. प्रत्येक मुला-मुलीला शिक्षणाचा आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे.  शिक्षणाचे महत्त्व सांगतानाच, आरोग्य आणि पुनर्वसन प्रक्रियेत ‘उडान’ प्रकल्प कशा प्रकारे मदतीचा हात देतो, याचीही माहिती त्यांनी दिली.

अवश्य वाचा : जिल्हा परिषदेचा कनिष्ठ अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात; साडेसहा हजाराची मागितली लाच

परिवर्तनासाठी कटीबद्ध राहण्याची घेतली शपथ (Snehalaya)

यावेळी उपस्थित सर्वांनी बालविवाह रोखण्यासाठी आणि सामाजिक परिवर्तनासाठी कटीबद्ध राहण्याची शपथ घेतली.सम्राट अशोक यांच्या ‘धम्म’ विचारांनुसार सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्यासाठी हे अभियान एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. ‘स्नेहालय’च्या या उपक्रमामुळे पारनेर तालुक्यातील ग्रामीण भागात बालविवाहाबाबत मोठी जनजागृती होण्यास मदत होणार आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित

या सामाजिक अभियानाला समाजातील विविध स्तरांतून पाठिंबा मिळात आहे. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र करंदीकर, श्रावण गायकवाड, सुरेश रोकडे, बाळासाहेब पातारे, देवेंद्र जाधव, रमेश गायकवाड, संतोष वाबळे, संतोष अडसूळ, मोहन कसबे, वसंत पाडळे, दादाभाऊ पटेकर, गौतम सूर्यवंशी, प्रकाश करंदीकर, सुनील चौधरी, जनार्दन सोनवणे, सुभाष गायकवाड,  प्रदीप नगरे, चंद्रकांत शिंदे, महेंद्र बोरुडे, प्रदीप कसबे, राजु उघडे यांसह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.