Social Awards : नगर : इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने राज्य शासनातर्फे (State Government) देण्यात येणाऱ्या विविध सामाजिक पुरस्कारांसाठी (Social Awards) पात्र व्यक्ती व संस्थांकडून २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. समाजाच्या उन्नतीसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या घटकांनी आपले प्रस्ताव मुदतीत सादर करावेत, असे आवाहन सहायक सहसंचालक विनोद लोंढे (Vinod Londhe) यांनी केले आहे.
नक्की वाचा : आमदार रोहित पवार यांना झेड प्लस सुरक्षा द्या; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
मानाच्या पुरस्कारांचा समावेश
अहिल्यानगर येथील इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक कार्यालयामार्फत हे प्रस्ताव स्वीकारले जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार, नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार व क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार या मानाच्या पुरस्कारांचा समावेश आहे.
अवश्य वाचा : माझी वसुंधरा अभियानात उत्कृष्ट कामगिरीबद्दल अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा गौरव !
आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करणे बंधनकारक (Social Awards)
अर्जदार व्यक्ती किंवा संस्था महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक असून त्यांनी संबंधित क्षेत्रात सातत्यपूर्ण व उल्लेखनीय कार्य केलेले असावे. शासन निर्णयातील सर्व अटींची पूर्तता करून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. अपूर्ण, चुकीची माहिती असलेले किंवा मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत. या पुरस्कारांबाबतचा अंतिम निर्णय शासन स्तरावर घेण्यात येणार असून त्यासंदर्भात कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही. अर्जाचा नमुना व शासन निर्णयातील सविस्तर अटींची माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अहिल्यानगर जिल्हा कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे.



