Social Equality : कर्जत : लेखक समाजासाठी लिहीत असतो. तळागाळातील लोकांचे जगणे मांडणारे लेखन अधिकाधिक यायला हवे. मानव मुक्तीचा दृष्टिकोन समोर ठेवूनच लेखन करणे काळाची गरज बनली आहे. सावित्रीबाई फुले (Savitribai Phule), ताराबाई शिंदे (Tarabai Shinde), बहिणाबाई चौधरी यांचे लेखन महत्वपूर्ण आहे. बहुजन समाजाचा सलोखा (Social Equality) दिवसेंदिवस खालावत असून शिक्षक, विचारवंतांनी सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी आता प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ. वंदना महाजन यांनी केले. कर्जत येथे स्त्री हक्काच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दादा पाटील महाविद्यालयात आयोजित तिसऱ्या स्त्री – शिक्षिका साहित्य संमेलनाच्या (Women – Teacher Literary Conference) अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या.
अवश्य वाचा : संतोष देशमुख हत्या प्रकरणी अंबादास दानवेंनी केली ‘ही’ मागणी
यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले की,
क्रांतीज्योती सावित्रीबाईंचे विचार आजही समाजापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले महिलांनी वाचले पाहिजेत. सावित्रीबाई फुले यांनी तत्कालीन स्त्री शिक्षणाला विरोध करणाऱ्यांचे शेण, दगड-गोटे झेलत संघर्ष केला. भविष्यासाठी हा संघर्ष किती गरजेचा होता हे त्यांनी जाणले होते. आपली पहिली गुरु ही आई असते. तिच्याकडूनच खऱ्या अर्थाने संस्कार आपल्यावरती घडतात. महापुरुषांच्या जयंतीचा जागर अशा पद्धतीच्या संमेलनातून पुढे जाणे ही काळाची गरज आहे. अलीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान पुढे जायला लागले आहे. कल्चरल पॉलिटिक्स घातक ठरत असून चुकीच्या गोष्टी दाखविण्यापेक्षा महामानवांवरील चित्रपट दाखविणे गरजेचे आहे. लेखकाने लिहिलेले साहित्य कृतीत आणले तर परिवर्तन अटळ असल्याचे अधोरेखित केले.
नक्की वाचा : शेतीचे उत्पादन वाढविण्यास केंद्र शासनाचे सर्वोच्च प्राधान्य: चौहान
संमेलनाचे स्वागताध्यक्ष राजेंद्र फाळके म्हणाले की, (Social Equality)
मनुस्मृतीमध्ये स्त्रीला दुय्यम स्थान मानले गेले आहे. स्त्री स्वतंत्र नाही असे म्हटले गेले. परंतु स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वावर अनेक क्षेत्रांमध्ये प्रभाव निर्माण करून आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. स्त्रीशिक्षिका साहित्य संमेलनाचा हा प्रयोग प्रथमच कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयांमध्ये सुरू असल्याचे त्यांनी म्हंटले. या संमेलनामध्ये महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शाखेतील जवळपास नऊशेपेक्षा अधिक स्त्री-शिक्षिकांनी सहभाग नोंदवला. या संमेलनाचे सूत्रसंचालन प्रा. स्वप्निल म्हस्के यांनी केले. तर आभार प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी मानले.