Social media : सोशल मीडियावरून बदनामी करणाऱ्यांवर होणार कारवाई

Social media : सोशल मीडियावरून बदनामी करणाऱ्यांवर होणार कारवाई

0
Social media

Social media : नगर : लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Elections) बिगुल वाजला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. या कालावधीत सोशल मीडियाचा (Social media) वापर करून लोकसभेसाठीच्या उमेदवारांची बदनामी केली जाऊ नये, यासाठी पोलीस (Police) प्रशासन सतर्क झाले आहे. सोशल मीडिया व इतर प्रसिद्धी माध्यमातून बदनामी करणाऱ्या तसेच आचार संहितेचा (Code of Conduct) भंग करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाचा सायबर पोलीस ठाणे कारवाई करणार आहे, अशी माहिती सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनेश आहेर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

Social media

हे देखील वाचा : कर्जत एमआयडीसीचा प्रश्न पुन्हा न्यायालयात

लोकसभा निवडणुक प्रचार (Social media)

लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत उमेदवारांचे प्रचारा दरम्यान सोशल मीडियाव्दारे बदनामी करणे, अफवा पसरविणे, द्वेषपूर्ण संदेश, खोटे संदेश तसेच प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक व सोशल मिडियाव्दारे प्रसारित होणाऱ्या फेक न्यूज प्रसारीत करणे, कायद्याने गुन्हा आहे. अशा प्रकारचे संदेश व अफवा पसरवून दोन समाजात अथवा गटात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सायबर पोलीस ठाण्याकडून सोशल मीडियावर विशेष लक्ष राहणार आहे. अफवा पसरविणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

नक्की वाचा : आला रे आला बिबट्या आला, कधी हल्ले, तर कधी हुलकावणी; ‘या’ परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

जिल्हा पोलीस दलाकडुन सर्व नागरिकांना आवाहन (Social media)

लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी नगर जिल्हा पोलीस दलाकडुन सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारे सोशल मीडियाव्दारे बदनामी करणे, अफवा पसरविणे, व्देषपूर्ण संदेश, खोटे संदेश तसेच प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाव्दारे प्रसारित होणाऱ्या फेकन्यूज संदर्भात तक्रार देण्यासाठी नगर जिल्हा पोलीस दलाकडून ९१५६४३८०८८ हा मोबाईल क्रमांक प्रसारीत करण्यात आला आहे. या मोबाईल क्रमांकावर व्हॉटसअॅप सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. तरी नागरिकांनी आपल्या वरील तक्रारी नमूद मोबाईल क्रमांक यावर कराव्यात, प्राप्त तक्रारीवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे पोलीस प्रशासनाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here