Social Media : नगर : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या (Ahilyanagar Municipal Corporation Election) पार्श्वभूमीवर शहरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. सोशल मीडियाच्या (Social Media) गैरवापर रोखण्यासाठी शहर पोलिसांनी कंबर कसली आहे. शहरातील कोतवाली, तोफखाना व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या (Bhingar Camp Police Station) प्रभारी अधिकाऱ्यांनी सोशल मीडिया ग्रुप ॲडमिन आणि सदस्यांना कडक इशारा देणारी नोटीस बजावली आहे.
अवश्य वाचा: जामखेड मधील हॉटेलमध्ये गोळीबार; हॉटेल मालक गंभीर जखमी
ग्रुप ॲडमिनही कायद्याच्या कचाट्यात
निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी पंकज आशिया (Pankaj Ashiya) यांनी जिल्ह्यात प्रतिबंधक आदेश लागू केले आहेत. कोणत्याही उमेदवाराची वैयक्तिक बदनामी करणे, फोटोंशी छेडछाड करून ते प्रसारित करणे किंवा जातीय व्देष पसरवणारे संदेश पाठवणे हा आता गुन्हा ठरणार आहे. विशेषतः व्हॉट्सॲप ग्रुपवर चुकीचा मजकूर आल्यास केवळ पाठवणाराच नाही, तर ग्रुप ॲडमिनलाही कायद्याच्या कचाट्यात धरले जाईल. तसेच राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणणारे स्टेटस ठेवल्यास थेट न्यायालयीन कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
नक्की वाचा : जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही: मुख्यमंत्री
हद्दीतील लोकांना सोशल मीडियाव्दारे ही नोटीस प्रसारित (Social Media)
कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी आपआपल्या हद्दीतील लोकांना सोशल मीडियाव्दारे ही नोटीस प्रसारित केली आहे.



