Solar City : शिर्डी साेलर सिटी करण्यासाठी महावितरणचा रॅलीच्या माध्यमातून जागर

Solar City : शिर्डी साेलर सिटी करण्यासाठी महावितरणचा रॅलीच्या माध्यमातून जागर

0
Solar City : शिर्डी साेलर सिटी करण्यासाठी महावितरणचा रॅलीच्या माध्यमातून जागर
Solar City : शिर्डी साेलर सिटी करण्यासाठी महावितरणचा रॅलीच्या माध्यमातून जागर

Solar City : नगर : शिर्डी शहराला साेलर सिटी (Solar City) करण्यासाठी महावितरणचा रॅलीच्या माध्यमातून जागर करण्यात येत आहे. त्यासाठी शिर्डी (Shirdi) शहरातील ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यासाठी महावितरणतर्फे (Mahavitaran) नुकतीच जनजागृती रॅली काढून जागर करण्यात आला. या रॅलीला हिरवी झेंडी महावितरणचे संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे व परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी दाखवली. यामध्ये महावितरणचे अधिकारी, अभियंते व कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

नक्की वाचा: मद्यधुंद पोलीस उपनिरीक्षकाकडून वृत्तपत्र छायाचित्रकारास मारहाण; पोलीस अधीक्षकांना निवेदन

महावितरण विविध विभागाच्या सहकार्याने प्रयत्नशील

शिर्डी शहर सौर शहर करण्याकरिता महावितरण शिर्डी साईबाबा संस्थान, शिर्डी नगर परिषद, महाऊर्जा व जिल्हा प्रशासन आणि ग्राहक या सर्वांच्या सहभागातून जनजागृती करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या माध्यमातून घरगुती सौर पॅनल बसवून सौर ऊर्जेपासून वीजनिर्मितीला प्राधान्याने गती देत छतावरील रूफटॉप सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती करून थेट ग्रीडला जोडण्यात येणार आहे.  शिर्डी शहर सौर शहर करण्याकरिता महावितरण विविध विभागाच्या सहकार्याने प्रयत्नशील आहे.

Solar City

अवश्य वाचा: मनसेच्या दोन गटात अमित ठाकरेंसमोरच वाद?

सौर शहर करण्याकरिता महावितरणने नियोजन तयार (Solar City)

या अंतर्गत नुकतेच ग्राहक संवाद मेळाव्याचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. यासोबतच ग्राहकांच्या घरी प्रत्यक्ष महावितरणचे कर्मचारी जाऊन यांनी सविस्तर सर्वेक्षण केलेले आहे. तसेच पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेची सविस्तर माहिती, फायदे, प्रक्रिया ग्राहकांना समजावून सांगितली जात आहे. सौर शहर करण्याकरिता महावितरणने विविध नियोजन तयार करण्यात आले आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून ही जनजागृती रॅली शहरातून काढण्यात आली. या रॅलीमध्ये सहभागी कर्मचाऱ्यांनी सौर योजनेसंदर्भात घोषवाक्यांचे फलक हातात घेत तसेच विविध घोषणा देऊन रॅलीत मार्गक्रमण करताना योजनेचा जागर केला. या रॅलीत नगर मंडळाचे अधीक्षक अभियंता रमेश पवार, कार्यकारी अभियंता अनिल थोरात, नाशिक परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी विकास आढे, शिर्डीचे उपकार्यकारी अभियंता डी. डी. पाटील यांचेसह अभियंते, अधिकारी व रॅलीत सहभागी झाले होते.