Solar Energy : जिल्ह्यातील सौर प्रकल्पांच्या कामांना गती द्या : जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

Solar Energy : जिल्ह्यातील सौर प्रकल्पांच्या कामांना गती द्या : जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

0
Solar Energy : जिल्ह्यातील सौर प्रकल्पांच्या कामांना गती द्या : जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ
Solar Energy : जिल्ह्यातील सौर प्रकल्पांच्या कामांना गती द्या : जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

Solar Energy : नगर : शेतकऱ्यांना अखंडित वीज उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य सरकारने (State Government) मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना (Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात सौर प्रकल्पासाठी (Solar Energy) प्रशासनाने जमीन उपलब्ध करून दिली आहे. या प्रकल्पांच्या कामांना संबंधित संस्थेने गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ (Siddharam Salimath) यांनी दिले आहेत.

अवश्य वाचा : चीनमध्ये ह्युमन मेटापन्यूमो व्हायरसचा हाहाकार; भारताला धोका?

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन

जिल्ह्यातील सौर प्रकल्पांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, महावितरण आणि वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

नक्की वाचा : मोठी बातमी!संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक

सालीमठ म्हणाले, (Solar Energy)

जामखेड तालुक्यातील रत्नापूर येथे दोन ते तीन दिवसात काम सुरू करावे. कर्जत तालुक्यातील बेलवंडी येथील जुन्या गावठाणातील जागा सौर प्रकल्पासाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव तयार करावा आणि संस्थेने तेथील काम तातडीने सुरू करावे. याच बांभोरा उपकेंद्राच्या परिसरात १० मेगावॅट प्रकल्पासाठी ३० एकर जागा निश्चित करण्यात यावी. शासकीय सौर प्रकल्पांना विरोध करणाऱ्यांवर आवश्यक कारवाई करावी.