Solar Project | नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) तालुक्यातील जेऊर येथील घुरुडी डोंगरावर सुरू असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे (Solar project) काम नियोजनाअभावी व मनमानी पद्धतीने सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना निवेदन देण्यात आले. शासनाचे व शेतकरी असल्याचे काम हिताचे सांगत संबंधित कंपनीकडून दडपशाहीच्या माध्यमातून काम सुरू असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
हेही वाचा – मुंबईत झालाय भारतातील पहिला संगीतमय रस्ता

सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीचे काम सुरू
जेऊर येथील गट क्रमांक ११७ मधील ३१ एकर सरकारी जागेवर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार असल्याचे सांगितले जात असले, तरी कामाच्या अंमलबजावणीत अनेक त्रुटी असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
अवश्य वाचा – शिक्षकाने चार अल्पवीयन मुलींवर अत्याचार केल्याचा आरोप; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
विद्युत पोल उभारण्याचे काम सुरू
प्रकल्प सुरू करण्यापूर्वी जागेची अधिकृत हद्द निश्चित करण्याची अट घालण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात हद्द निश्चिती न करताच काम सुरू केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसेच ग्रामपंचायतीला कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. ज्या रस्त्यावर विद्युत पोल उभारले जात आहेत, त्या रस्त्याची अधिकृत मोजणी व हद्द निश्चिती झालेली नसताना काम सुरू असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
हे पहा – अहमदाबाद विमान अपघात : पायलटने जाणूनबुजून…इटालियन वृत्तपत्राचा दाव्याने खळबळ…
या निवेदनावर अजय पवार, दिनेश पाटोळे, रवींद्र पवार, पांडुरंग पवार, महेश ससे, बबन शिंदे, अशोक पवार, सोनाली पवार, मयूर पवार, अमोल तोडमल, वैशाली तोडमल, सुमन तोडमल, नंदकुमार तोडमल, अश्विनी ससे, दिनेश ससे, निर्मला ससे, सौरभ शिंदे, संपत शिंदे, मीना शिंदे, शरद शिंदे, महेश दारकुंडे, सुमन दारकुंडे, सिद्धेश्वर दारकुंडे, अलका शिंदे, छाया पवार, सलीम शेख, सुरज ससे, मुस्ताक शेख, साकिब शेख, विजय वाघ आदी ग्रामस्थांच्या सह्या आहेत.



