Soldier : ज्ञानेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून सैनिक भावांसाठी ५०० राख्या

Soldier : ज्ञानेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून सैनिक भावांसाठी ५०० राख्या

0
Soldier : ज्ञानेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून सैनिक भावांसाठी ५०० राख्या
Soldier : ज्ञानेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून सैनिक भावांसाठी ५०० राख्या

Soldier : पाथर्डी : देशाच्या सीमांवर (Country Borders) आपले रक्षण करणाऱ्या सैनिकांना राखीच्या माध्यमातून प्रेम, आपुलकी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पाथर्डी येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयातील (Sant Dnyaneshwar Vidyalaya) विद्यार्थ्यांनी एक आगळावेगळा उपक्रम राबवत ५०० राख्या भारतीय जवानांना (Indian soldier) पाठवल्या.

अवश्य वाचा : लाल किल्ल्याच्या सुरक्षेत गंभीर चूक,किल्ल्याच्या आत पोहोचला डमी बॉम्ब;सात पोलीस निलंबित

विद्यार्थ्यांनी स्वतः हाताने तयार केल्या राख्या

युद्ध मैदानी भागात कार्यरत जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी स्वतः हाताने राख्या तयार करून त्या खास संदेशासह जवानांसाठी पाठवल्या. या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, प्रत्येक राखीसोबत एक हृदयस्पर्शी पत्र विद्यार्थ्यांनी लिहिले होते, ज्यामध्ये त्यांनी भारतीय सैन्याच्या त्याग व समर्पणाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती. या उपक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य सुरेश मिसाळ यांनी मार्गदर्शन केले. तर आत्माराम दहिफळे, पोर्णिमा नऱ्हे, दीपक ढाकणे, शिवाजी शेकडे, दिपक गावित, एकनाथ बुधवंत, विक्रम शिरसाठ, संतोष काळोखे, जयश्री इंदे, आबेदा सय्यद, पायल शर्मा, पूजा शिरसाट या शिक्षकांचा विशेष सहभाग उल्लेखनीय ठरला.

नक्की वाचा : भारताचा इंग्लंडवर थरारक विजय; कसोटी मालिका २-२ ने बरोबरीत

सैनिकांविषयी व्यक्त केला आदर (Soldier)

विद्यालयाच्या या राष्ट्रप्रेमी उपक्रमामध्ये संस्थेचे सचिव महेंद्र शिरसाट यांनी देखील विशेष सहकार्य केले. शाळेच्या विविध इयत्तांतील विद्यार्थ्यांनी राख्या तयार करताना देशभक्तीची भावना आणि सैनिकांविषयी आदर व्यक्त केला. राखी केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचे प्रतीक नसून, देशरक्षण करणाऱ्या जवानांप्रती प्रेम व आदराचा धागा आहे, हा उपक्रम केवळ राखी पाठविण्यापुरता मर्यादित नसून, विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, बंधुभाव, एकात्मता व कृतज्ञतेची भावना रुजविण्यासाठी प्रभावी ठरला आहे. जवानांच्या सेवेस मनःपूर्वक अभिवादन करत विद्यार्थ्यांनी हा राखी महोत्सव एका व्यापक सामाजिक संदेशात रूपांतरित केला आहे, असे यावेळी प्राचार्य सुरेश मिसाळ म्हणाले.