Somnath Gharge : पोलिसांसाठी चॅलेंज असलेला जिल्हा : सोमनाथ घार्गे

Somnath Gharge : पोलिसांसाठी चॅलेंज असलेला जिल्हा : सोमनाथ घार्गे

0
Somnath Gharge : पोलिसांसाठी चॅलेंज असलेला जिल्हा : सोमनाथ घार्गे
Somnath Gharge : पोलिसांसाठी चॅलेंज असलेला जिल्हा : सोमनाथ घार्गे

Somnath Gharge : नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्हा क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे. नागपूर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, रायगड आता पर्यंत माझी २३ वर्षे सेवा झाली आहे. मात्र अहिल्यानगर मध्ये गुन्ह्याचे वैविध्य, राजकारण असे सर्व प्रकारच्या कॉम्पलेक्स येत असतात. त्यामुळे पोलिसांसाठी आव्हान असलेला हा जिल्हा आहे. नवीन पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी शिकण्यासाठी खूप काही आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारी (Crime) कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे, प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (Somnath Gharge) यांनी केले.

Somnath Gharge : पोलिसांसाठी चॅलेंज असलेला जिल्हा : सोमनाथ घार्गे
Somnath Gharge : पोलिसांसाठी चॅलेंज असलेला जिल्हा : सोमनाथ घार्गे

नक्की वाचा : राज्यातील जमिनींची हिस्सेवाटप मोजणी अवघ्या २०० रुपयांत होणार; चंद्रशेखर बावनकुळे

राकेश ओला यांची मुंबई येथे उपायुक्तपदी बदली

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची मुंबई येथे उपायुक्तपदी बदली झाली. त्यांच्या जागेवर रायगड येथून सोमनाथ घार्गे हे बदलून आले असून त्यांनी पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर पोलीस मुख्यालयात राकेश ओला यांना निरोप व सोमनाथ घार्गे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, वैभव कुलबर्मे, पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती, संपत भोसले, बसवराज शिवपुजे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, उमेश परदेशी, प्रताप दराडे, सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, जगदीश मुलगीर, प्रल्हाद गीते यांसह पोलीस उपनिरीक्षक आदी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Somnath Gharge : पोलिसांसाठी चॅलेंज असलेला जिल्हा : सोमनाथ घार्गे
Somnath Gharge : पोलिसांसाठी चॅलेंज असलेला जिल्हा : सोमनाथ घार्गे

अवश्य वाचा : संभाव्य आपत्ती परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे : डॉ. पंकज आशिया

यावेळी सोमनाथ घार्गे म्हणाले, (Somnath Gharge)

राकेश ओला यांनी जिल्ह्यात चांगले काम केले आहे. त्यांनी चांगला पाया तयार केला आहे. जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था तसेच लहान मुले, महिलांवरील अत्याचार, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवले जातील. तसेच मुख्यमंत्री यांनी सुरु केलेल्या १०० दिवसांचा कार्यक्रमावर काम केले जाणार असून जिल्ह्यातील गुन्हे कमी करण्यावर भर दिला जाणार आहे.

यावेळी राकेश ओला म्हणाले, जिल्ह्यात मनुष्यबळ कमी आहे. त्या तुलनेत गुन्ह्याची संख्या जास्त आहे. त्यामुळे पोलिसांवर निश्चितच कामाचा ताण पडत आहे. याकाळात लोकसभा, विधानसभा निवडणूक तसेच सण उत्सव व मिरवणूक शांततेत पार पाडल्या आहेत. हे माझे एकट्याचे यश नाही, हे सर्वांच्या सहकार्यानेच शक्य झाले आहे, असे राकेश ओला यांनी सांगितले.