Somnath Gharge : तर ‘त्या’ अधिकाऱ्यांवर होणार कारवाई : सोमनाथ घार्गे

Somnath Gharge : तर 'त्या' अधिकाऱ्यांवर होणार कारवाई : सोमनाथ घार्गे

0
Somnath Gharge : तर 'त्या' अधिकाऱ्यांवर होणार कारवाई : सोमनाथ घार्गे
Somnath Gharge : तर 'त्या' अधिकाऱ्यांवर होणार कारवाई : सोमनाथ घार्गे

Somnath Gharge : नगर : जिल्ह्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तत्काळ योग्य तो तपास करुन गुन्हयांची निर्गती करणेबाबत, तसेच फरारी आरोपींचा शोध घेवून योग्य ती कायदेशिर कारवाई (Legal action) करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (Somnath Gharge) यांनी दिल्या आहेत. त्यांनी नेमलेले विशेष पथकाने पोलीस (Police) ठाणे हद्दिमध्ये छापे टाकले असता, कोणत्याही प्रकारचा अवैध धंदा ज्या पोलीस ठाणे (Police station) हद्दीमध्ये निदर्शनास येईल, त्यांस संबंधीत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी हे जबाबदार राहातील व त्यांचे विरुध्द शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, अशा सक्त सूचना त्यांनी दिल्या आहेत.

अवश्य वाचा : निराधार बालकांना आधार कार्ड मिळणार

जिल्ह्यातील प्रलंबित गुन्ह्याचा घेतला आढावा

अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयात दुरदृश्य प्रणालीव्दारे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील प्रलंबित गुन्ह्याचा आढावा घेतला आहे. यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर पोलीस अधीक्षक, जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी तसेच सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी होते.

नक्की वाचा : बापरे! कोल्हापूरातील धार्मिक संस्थेत अल्पवयीन विद्यार्थ्याची शॉक देऊन हत्या

प्रतिबंधक कारवाई करणेबाबत विशेष सुचना (Somnath Gharge)

विशेषत: सराईत गुन्हे करणारे आरोपी यांचेवर प्रतिबंधक कारवाई करणेबाबत विशेष सुचना देण्यात आल्या आहेत. अहिल्यानगर जिल्हा हद्दीत अवैध धंदे, अवैध गुटखा, सुगंधी तबांखु विक्रीे, गोमांस विक्री, अवैध दारु, गांजा, ड्रग्स विक्री, अवैध वाळू, अवैध पेट्रोलियम पदार्थ विक्री, बिंगो जगावर कारवाई करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.