Somnath Gharge : नगर : अहिल्यानगर, श्रीरामपूर, संगमनेर शहर हे अंमली पदार्थ विक्रीचे केंद्र बनत आहे. पोलीस प्रशासनाने याविरोधात कंबर कसली असून अमली पदार्थांची (Drugs) विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (Somnath Gharge) यांनी दिल्या आहेत. तसेच या कारवाईमध्ये पोलीस प्रशासनाचे (Police Administration) अधिकारी अथवा कर्मचारी यांचा संबंध आला तर त्यांना खात्यातून बडतर्फ करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
नक्की वाचा: पाथर्डी शहरात फ्रॉड कॉल्सचा कहर; मोबाईलवर आले शेकडो ओटीपी
पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषद
पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ आदीसह कर्मचारी उपस्थित होते. अमली पदार्थाबाबत गेल्या महिन्यात श्रीरामपूर मधून नशेची इंजक्शन हस्तगत करण्यात आली होती.
आवश्य वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व कत्तलखाने व सर्व मांस विक्री केंद्र दोन दिवस बंद
अमली पदार्थ विक्री विरोधात कारवाईच्या सूचना (Somnath Gharge)
आता पुन्हा दोन दिवसापूर्वी याबाबत कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात अमली पदार्थ विक्री विरोधात कारवाईच्या सूचना संबंधित पोलीस प्रभाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचे पोलीस अधीक्षक घार्गे यांनी सांगितले.