जि.प.क्रीडा स्पर्धेत संगमनेर पंचायत समितीला जनरल चॅम्पियनशीप
Somnath Gharge : नगर : मैदान हे असे ठिकाण आहे की जिथे सर्व ताणतणाव विसरून प्रत्येक जण खेळावर लक्ष केंद्रीत करुन खेळाचा आनंद घेतो. अनेकदा एका कार्यालयात काम करूनही आपसात तितका संवाद नसतो. मैदानात मात्र एकत्र येवून संवाद साधावा लागतो. एकत्र खेळताना अधिकारी, कर्मचारी यांच्यातील अंतर कमी होते. प्रत्येकाने खेळाकडे गांभीर्याने पहायला हवे. कारण खेळाइतके चांगले मेडिटेशन नाही. ते शरीर व मनाला ऊर्जा देते. जिल्हा परिषद (Zilla Parishad) कर्मचाऱ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे क्रीडा स्पर्धांमध्ये (Sports Competition) सहभाग नोंदवला. हे कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे (Somnath Gharge) यांनी केले.

नक्की वाचा: अहिल्यानगर तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींवर प्रशासकराज!
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्यावतीने अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी तीन दिवसीय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा समारोप पारितोषिक वितरण समारंभाने झाला. क्रीडा स्पर्धेत संगमनेर पंचायत समितीने प्रथम क्रमांकासह जनरल चॅम्पियनशिप मिळवली. अकोले पंचायत समितीला व्दितीय क्रमांक मिळाला. बक्षिस वितरण कार्यक्रमास पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, डॉ.स्मिता भंडारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, दादाभाऊ गुंजाळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, संध्या गायकवाड, सुधीर शिंदे, शिवम डपकर आदींसह जिल्ह्यातील गट विकास अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अवश्य वाचा : त्रिभाषा धोरण समितीचा अहवाल राज्य सरकारकडे सादर; आता मंत्रिमंडळात होणार मोठा निर्णय?
आनंद भंडारी म्हणाले, (Somnath Gharge)
तीन दिवस सर्वांनी अतिशय उत्साहात स्पर्धेत सहभाग नोंदवला. अतिशय शिस्तबध्द रितीने स्पर्धा पार पडली. सांस्कृतिक कार्यक्रमातही कर्मचाऱ्यांनी आपले कलागुण दाखविले. शासकीय नोकरीत नेहमीच ताणतणावाचा सामना करावा लागतो. कारण लोकांच्या खूप अपेक्षा असतात. अशावेळी क्रीडा स्पर्धांमुळे तणाव दूर होण्यास मदत होते. पुढील वर्षी नाशिक विभागातील पाच जिल्हा परिषदांच्या आंतर जिल्हा स्पर्धा घेण्याचा प्रयत्न राहील, असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात राहुल शेळके म्हणाले, तीन दिवस अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सर्वांनी खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद लुटला. खिलाडूवृत्ती, संघभावनेचे दर्शन घडले. रोजच्या धावपळीच्या, धकाधकीच्या जीवनातून प्रत्येकाला थोडा विरंगुळा मिळाला. आरोग्याप्रती अधिक जागरूक राहण्याची प्रेरणा मिळाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिनाथ मोरे यांनी केले तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ यांनी आभार मानले.



