नगर : परभणीमध्ये न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सुर्यवंशी (Somnath Suryawanshi) यांच्या मृत्यू प्रकरणी (Death Case) मोठी माहिती समोर आली आहे. सोमनाथ सूर्यवंशी या विद्यार्थ्यांच्या मृत्यूला पोलिसच जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा,असे निर्देश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले होते. आता सर्वोच्च न्यायालयानेही (Supreme Court) हा आदेश कायम ठेवला आहे. त्यामुळे आरोपी पोलिसांवर लवकरच गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत,अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar) यांनी दिली आहे.
नक्की वाचा : रेव्ह पार्टी म्हणजे काय?आरोप सिद्ध झाल्यास काय होते शिक्षा?
सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा आदेश कायम (Somnath Suryawanshi Case)
महाराष्ट्र राज्य आणि इतर विरुद्ध विजयबाई वेंकट सूर्यवंशी या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली आहे. या निर्णयामुळे सोमनाथच्या कुटुंबियांच्या आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या लढ्याला यश मिळाले आहे.
अवश्य वाचा : सनी देओल आणि एक्सेल एंटरटेनमेंट पहिल्यांदाच एकत्र; डिसेंबरपासून अॅक्शन थ्रिलर चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात
काय घडले होते परभणीत? (Somnath Suryawanshi Case)
१० डिसेंबर २०२४ रोजी परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली होती. या घटनेनंतर आंबेडकरी संघटनांनी परभणीत तीव्र आंदोलन करत बंद पुकारला होता. या बंदला अचानक हिंसक वळण लागले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. तसेच लाठीचार्जही केला.याचवेळी मूळचा लातूरचा आणि पुण्यात कायद्याचे शिक्षण घेणारा विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र अवघ्या दोनच दिवसांत पोलीस कोठडीत सोमनाथचा मृत्यू झाला होता. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी या याचिकेवर सोमनाथची बाजू मांडली होती. आता सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना न्याय मिळाला आहे.