Sonali Lioness:अहिल्यानगरच्या डॉक्टरांच्या आजोबांनी पाळली होती सिंहीण;ती खायची दूध-भात     

0
Sonali Lioness:अहिल्यानगरच्या डॉक्टरांच्या आजोबांनी पाळली होती सिंहीण;ती खायची दूध-भात     
Sonali Lioness:अहिल्यानगरच्या डॉक्टरांच्या आजोबांनी पाळली होती सिंहीण;ती खायची दूध-भात     

Sonali Lioness : प्राण्यांवर प्रेम केल्यानंतर प्राणीसुद्धा आपल्यावर जीवापाड प्रेम करतात,असा अनुभव आपल्या सगळ्यांनाच आला असेल. अशाच प्रकारचा अनुभव चाळीसगाव (जि. जळगाव) येथील डॉ. वा. ग. ऊर्फ काकासाहेब पूर्णपात्रेच्या (Kakasaheb Purnpatre) कुटुंबीयांना आला होता. उत्तम शिकारी असणाऱ्या डॉ. पूर्णपात्रे यांनी ‘सोनाली’ नावाची सिंहीण (Sonali Lioness) पाळली होती. तिला पुण्याच्या पेशवे पार्कमध्ये (Peshwa Park) हस्तातंरित करताना प्राण्यांसोबत असणाऱ्या मानवी ऋणानुबंधाचे दर्शन त्यांनी लिहिलेल्या ‘सोनाली’ या पुस्तकातून घडते. या सिहिणींच्या बाबतीत अहिल्यानगरमधील नेत्रतज्ज्ञ असलेल्या डॉ. दीपाली पूर्णपात्रे यांनी एका शैक्षणिक ऑनलाईन चर्चासत्रात तिच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत.

नक्की वाचा : “कबुतरखाने अचानक बंद करणे योग्य नाही”-देवेंद्र फडणवीस
डॉ. दीपाली पूर्णपात्रे  यांनी सांगितले की, मी सिंहिणीशी खेळत होते, तेव्हा तर काही कळतच नव्हते. सिंहीण काही करणार नाही,असा कुटुंबीयांचा विश्वास होता. सोनालीला उद्यानात सोडल्यानंतर काही दिवस तिने जेवण घेतले नाही. यासंदर्भात उद्यानाकडून पत्र आल्यानंतर आम्ही सर्वजण पुण्याला गेलो. तेथे आजोबांनी अर्थातच डॉ. पूर्णपात्रे यांनी सोनालीला दिसणार नाही अशा ठिकाणावरून तिला हाक मारली. तेव्हा हा आवाज डॉक्टरांचाच आहे, असे तिने ओळखले व ती कावरीबावरी झाली. आपले आजोबा, रूपाली कुत्रीला घेऊन आतमध्ये गेले. सोनालीला दूध पाजले व शांत केले, मात्र  बाहेर पडलो तर पुन्हा ती जेवणार नाही म्हणून रूपालीला तेथे सोनालीसोबत काही दिवस ठेवले, ती अगदी करवलीसारखी तिच्यासोबत राहिली, असे त्यांनी सांगितले आहे.

सोनालीसोबत असणारे अनुभव डॉ. पूर्णपात्रे यांच्या पुस्तकात लिहिण्यात आले आहेत. या पुस्तकातील एका पाठाचा समावेश दहावीच्या अभ्यासक्रमात २०१८ पासून करण्यात आला आहे. या पुस्तकातील एक प्रकरण नववीतील विद्यार्थ्यांसाठी होते, त्यानंतर काही काळ ते वगळण्यात आले होते.

अवश्य वाचा : लाल किल्ल्याच्या सुरक्षेत गंभीर चूक,किल्ल्याच्या आत पोहोचला डमी बॉम्ब;सात पोलीस निलंबित

डॉ. पूर्णपात्रे यांच्या जीवनात सोनाली कशी आली ? (Sonali Lioness)

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड- चाळीसगाव सीमेवर असणाऱ्या गौताळा, पाटणादेवी जंगलात पूर्वी वन्यप्राण्यांचा मोठा वावर होता. या हिंस्त्र प्राण्यांचा शेतकऱ्यांना त्रास होत असे.त्यावेळी  शिकारीला कायद्याने बंदी नव्हती. डॉ. पूर्णपात्रे हे मूळचे चाळीसगावचे. वैद्यकीय व्यवसायाबरोबर ते एक उत्तम शिकारी होते. त्यांनी १५ मोठ्या प्राण्यांची शिकार केली होती. तसेच त्यांना पक्षी, प्राणी पाळण्याचाही छंद होता. ‘गीता’ नावाची वाघीण त्यांच्याकडे होती. २९ ऑगस्ट १९७३  रोजी त्यांचे मित्र डॉ. चित्रे यांनी आणलेल्या सिंहीणच्या तीन पिल्लांपैकी कमी गुरगुरणाऱ्या पिल्लाची त्यांनी निवड केली. आणि या पिल्लाचे नाव त्यांनी ‘सोनाली’ ठेवले होते.

सोनाली नाव ठेवण्यामागे कारण काय ? (Sonali Lioness)

सिंहकन्येचे आगमन होण्यापूर्वी पंधरा दिवस अगोदर पांढऱ्या शुभ्र केसांच्या कुत्रीचे आगमन डॉक्टरांकडे झाले होते. तिच्या सुंदर रूपावरून त्यांनी तिचे नाव ‘रूपाली’ ठेवले होते. काही दिवसांनंतर डॉक्टरांना नात झाली. तिचे नाव ‘दीपाली’ (डॉ. सुभाष पूर्णपात्रे यांची कन्या) असे ठेवले. सिंहकन्येचे नाव काय ठेवावे, या विचारात ते असतानाच त्यांना  ‘सोनाली’ हे नाव सुचले. याबद्दल पुस्तकात त्यांनी लिहून ठेवलेले आहे. सोन्यासारखे केस असलेली सुवर्णकांतीची ती मादी कोचावर बसली होती. तिच्या पाठीवरून हात फिरवताना मला एक नाव सुचले ‘सोनाली’, असं वर्णन पुस्तकात करण्यात आले आहे. 

सोनाली नाव का ठेवले…

या सिंहकन्येचे आगमन होण्यापूर्वी पंधरा दिवस अगोदर पांढऱ्या शुभ्र केसांच्या कुत्रीचे आगमन डॉक्टरांकडे झाले होते. तिच्या रूपावरून तिचे नाव ‘रूपाली’ ठेवले होते. काही दिवसांनंतर डॉक्टरांना नात झाली. तिचे नाव ‘दीपाली’ (डॉ. सुभाष पूर्णपात्रे यांची कन्या) असे ठेवले. सिंहकन्येचे नाव काय ठेवावे, या विचारात ते असतानाचा ‘सोनाली’ हे नाव सुचले. याबद्दल पुस्तकात डॉ. पूर्णपात्रे यांनी लिहिले आहे की, सोन्यासारखे केस असलेली सुवर्णकांतीची ती मादी कोचावर बसली होती. तिच्या पाठीवरून हात फिरवताना मला एक नाव सुचले ‘सोनाली’.

दूधभात खाणारी एकमेव सिंहीण

सोनाली दिवसातून तीन वेळा जेवत असे. सकाळी नाश्ता. त्यात दूध आणि अंडी असत. दुपारी जेवताना खिमा आणि रात्री दूध पोळी किंवा दूध भात. जेवायची वेळ झाली की, ती स्वयंपाकघरात जाई आणि स्वयंपाकीण बाईच्या पायात घोटाळत राही. तोंडानं आव आव करीत त्यांच्याकडे जेवणाची मागणी करी. पण तिचं जेवण ताटलीत पडलं की ती गुरगुरायला लागे. जिभेनं ताटली चाटून पुसून साफ होईपर्यंत तोंडाने तिची गुरगुर चालूच राहायची. दूध पोळी किंवा दूध भात खाणारी जगातली ती एकमेव सिंहीण असावी, असा अभिप्राय डॉक्टरांनी पुस्तकात नोंदविला आहे.

पेशवे पार्ककडे हस्तांतरण

३१ मार्च १९७४ रोजी पुण्यातील पेशवे बागकडे सोनालीला हस्तांतरित करण्याचे ठरले होते. त्यादिवशी घरातील वातावरण सुतक पडल्यासारखे  होते,अशा भावना डॉ. व्यक्त केल्या आहेत.