Sonam Raghuvanshi Case : मध्य प्रदेशातील इंदोरच्या राजा रघुवंशी हत्या (Raja Raghuvanshi murder) प्रकरणातील गूढ आता वाढत चाललं आहे. राजा रघुवंशीची हत्या त्याची पत्नी सोनमने केल्याचं स्पष्ट झालं. या हत्येनंतर सोनम (Sonam Raghuvanshi) मेघालयातून गाजीपूरला पळून गेली आणि दबावाखाली तिने आत्मसमर्पण (Surrender) केले. राजा रघुवंशी हत्या प्रकरणात सोनम तिचा कथित प्रियकर राज कुशवाह सह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. सोनमच्या अटकेनंतर आता या हत्या प्रकरणात वेगवेगळे खुलासे समोर येत आहे.
नक्की वाचा : मोठी बातमी! मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ लोकल ट्रेनमधून पडून ५ जणांचा मृत्य
प्रकरण नेमकं काय ? (Sonam Raghuvanshi Case)
११ मे रोजी सोनम आणि राजा रघुवंशीचं इंदोरमध्ये लग्न झालं. दोघांच्या सहमतीनंच लग्न झाल्याचा दावा दोन्हीकडच्या कुटुंबीयांकडून केला जात आहे. काही दिवस सासरी राहिल्यानंतर २० मे रोजी सोनम रघुवंशी पतीसह फिरायला मेघायल येथील शिलाँगला गेली. यावेळी सोनमनंच शिलाँगचं पूर्ण नियोजन केल्याचा दावा राजाच्या आईनं केला आहे. २३ मे पासून दोघेही अचानक बेपत्ता झाले. २ जूनला थेट राजा रघुवंशीचा मृतदेह पोलिसांना सापडला. त्यानंतर सोनमचा शोध सुरू झाला. ८ जूनच्या रात्री उत्तर प्रदेशमधल्या गाझीपूरमध्ये एका ढाब्यावर सोनम सापडली. ९ जूनला सोनमने पोलिसांसमोर सरेंडर केलं आहे.
अवश्य वाचा : मोठी बातमी!पीओपी गणेश मूर्तींवरील बंदी उठवली,हायकोर्टाचा निर्णय
कोण आहे राज कुशवाह ?(Sonam Raghuvanshi Case)
मात्र आता या चर्चेत आत्तापर्यंत कुठेच नसलेला राज कुशवाह समोर आलाय. सोनमनं राज कुशवाह याच्याशी संगनमत करूनच पती राजा रघुवंशीची मेघालयमध्ये हत्या घडवून आणल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे. राज कुशवाह हा सोनमचा प्रियकर आहे. राज कुशवाह हा सोनमच्या वडिलांच्या प्लायवूड कंपनीत कामाला होता. दोन वर्षांपूर्वीच राज कुशवाह आणि सोनम रघुवंशीची ओळख झाली. या ओळखीचं रुपांतर मैत्रीत व नंतर प्रेमात झाल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.
सोनमनंच राज कुशवाहला लोकेशन पाठवलं…(Sonam Raghuvanshi Case)
मेघालयमध्ये असताना सोनमनंच ते दोघे नेमके कुठे आहेत, ते कळवण्यासाठी त्यांचं लोकेशन राज कुशवाहला पाठवलं. राज कुशवाहनं सुपारी दिलेल्या भाडोत्री मारेकऱ्यांनी त्या लोकेशनच्या सहाय्याने सोनम व राजा रघुवंशी यांचा शोध घेतला आणि तिथे पोहोचून राजाची हत्या केली. इकडे राज कुशवाह मात्र नामानिराळा राहून इंदोर मध्येच थांबला. मेघालयमध्ये पोलीस सोनमचा शोध घेत असताना, राजाचा मृतदेह सापडल्यानंतर राज कुशवाह चक्क तिच्या कुटुंबीयांसमवेतही धीर देताना दिसून आला.“आरोपींनी मेघालयमध्ये आधी राजाची हत्या करून नंतर त्याचा मृतदेह कुणाचंही लक्ष जाणार नाही अश्या ठिकाणी टाकला. या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवता यावं म्हणून राज कुशवाह इंदोरमध्येच दोघांच्या कुटुंबीयांच्या आसपास राहिला. हत्येच्या काही दिवस आधी सोनम व राज कुशवाह सातत्याने एकमेकांच्या संपर्कात असल्यामुळे राजवरचा आमचा संशय बळावला”,अशी माहिती क्राईम ब्रांचच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे
या हत्या प्रकरणात सोनमसह पाच जणांना अटक करण्यात आली. त्यामुळे राजा रघुवंशी याची हत्या प्रकरणात अजून कोणकोणते खुलासे होणार आणि हे प्रकरण पुढे काय वळण घेणार हे पाहणे औस्त्युक्याचे ठरणार आहे.