Sonu Sood : टीव्ही जगतात सामाजिक आणि भावनिक कथांसाठी ओळखला जाणारा स्टार प्लस (Star Plus) आता आणखी एक प्रभावशाली फिक्शन ड्रामा शो ‘संपूर्णा’ (Sampurna Show) घेऊन येत आहे. या शोची खासियत म्हणजे याचा ट्रेलर लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Bollywood actor Sonu Sood) लाँच (Launch) करणार आहे.
नक्की वाचा : मराठा आरक्षणासाठी फडणवीस संविधानात बदल का करत नाहीत? संजय राऊतांची विचारणा
सोनू सूद नेमकं काय म्हणाला ? (Sonu Sood)
सोनू सूदने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत लिहिले, “गणेश चतुर्थीच्या रंगात आणि आनंदात हरवून जाणं सोपं आहे, पण आपल्या आजूबाजूला अनेक महिला आहेत ज्या दररोज अशा लढाया लढत आहेत, ज्या त्यांना कधीच लढायच्या नव्हत्या. हा ट्रेलर पाहून मी हेलावून गेलो, कारण ही केवळ एक कथा नाही. तर आपल्या समाजाचं प्रतिबिंब आहे. यंदा जर मी बाप्पाकडे एकच प्रार्थना करायची असेल, तर ती अशी की, त्यांनी प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील विघ्न दूर करावीत.
अवश्य वाचा : मराठा आंदोलनामुळे मुंबईत वाहतूक कोंडी,पहा कोणते रस्ते बंद?
सोनू सूद हा असा अभिनेता आहे, जो नेहमीच अशा कहाण्यांचा भाग व्हायला प्राधान्य देतो, ज्या केवळ मनोरंजन करत नाहीत, तर समाज आणि माणुसकीशी संबंधित प्रश्नांवर प्रकाश टाकतात. सामान्य माणसाच्या दैनंदिन संघर्षांशी जोडलेलं त्याचं नातं, त्याला ‘संपूर्णा’ सारख्या अर्थपूर्ण शोच्या ट्रेलरचे परफेक्ट लॉन्चर बनवतो.
ट्रेलरमध्ये नेमकं काय ?(Sonu Sood)
या शोच्या ट्रेलरमध्ये मिट्टी नावाच्या एका महिलेची कथा उलगडली जाते. सात वर्षांपासून आपलं वैवाहिक जीवन सांभाळणारी आणि चार वर्षांच्या मुलाची आई असलेली मिट्टी,तिचं आयुष्य बाहेरून परिपूर्ण वाटतं. पण आयुष्य नेहमी तसंच नसतं. एका क्षणात तिचं जग बदलून जातं, जेव्हा तिला समजतं की तिचा नवरा डॉ. आकाश याला एका गंभीर प्रकरणात अटक करण्यात आली आहे. आकाश स्वतःला निर्दोष सांगतो आणि या संपूर्ण प्रकरणात त्याला अडकवलं गेलं आहे, असं त्याचं म्हणणं आहे. ‘संपूर्णा’ हा शो ८ सप्टेंबरपासून, दररोज संध्याकाळी ७:३० वाजता स्टार प्लसवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.