SP : नगर : अहिल्यानगरचे नवे पोलीस अधीक्षक (SP) सोमनाथ घार्गे (Somnath Gharge) यांनी पदभार स्वीकारताच पोलीस (Police) प्रशासनाचा लोकाभिमूख कारभार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नागरिकांची पोलीस प्रशासनाबाबतची मते, पोलिसांच्या कामकाजा बाबत अभिप्राय मागविले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा (Advanced technology) वापर करत डिजिटल माध्यमातून हे अभिप्राय मागवण्यात आले आहेत.
नक्की वाचा : ‘उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करायला पाहिजे’;अनिल बोंडेंची टीका
चांगल्या सेवेसाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध
अहिल्यानगरकरांना चांगली सेवा देण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे. अहिल्यानगर पोलिसांच्या कामाविषयी आपल्याला काय वाटते, आम्ही कोणत्या गोष्टींना प्राथमिकता द्यायला पाहिजे तसेच पोलिसांच्या कामकाजामध्ये सुधारणा करण्यासाठी आम्ही क्युअर कोड च्या माध्यामातून आपले मत घेत आहोत. त्यामुळे तुमचा अभिप्राय पोलीस प्रशासनाच्या कामकाजासाठी महत्वाचा ठरणार आहे. त्यामुळे या मोहिमेत आपले मत नोंदवावे.
अवश्य वाचा : सभापती राम शिंदेंचा रोहित पवारांना सहावा धक्का; जामखेड बाजार समितीच्या उपसभापतींवर अविश्वास प्रस्ताव
हे डिजिटल अभिप्राय मिळवण्यासाठी अहिल्यानगर पोलीस प्रशासनातर्फे दहा दिवस ही मोहीम राबविली जाणार आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनाने दिलेला क्युअर कोड स्कॅन करून पोलीस प्रशासनातील समस्येबाबत अभिप्राय द्यावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले आहे.
क्युआर कोडमध्ये काय आहे (SP)
- ◼️ क्युआर कोड गुगल स्कॅनरवर स्कॅन करताच एक डिजिटल अभिप्राय अर्जाची लिंक मिळेल.
- ◼️ या लिंकला क्लिक करताच डिजिटल अभिप्राय अर्ज मिळेल.
- ◼️ ही माहिती इंग्रजी अथवा मराठीतून भरता येईल.
- ◼️ यात वैयक्तिक माहितीत नाव व फोन नंबर वैकल्पिक असणार आहे. मात्र, पोलीस ठाणे नोंदवावे लागणार आहे.
- ◼️ पोलिसांच्या कामकाजाबाबत ५० शब्दांत अभिप्राय द्यायचा आहे.
- ◼️ जिल्ह्यातील पोलिसांच्या कामकाजाला दहा पैकी रेटिंग द्यायचे आहे.
- ◼️ पोलीस प्रशासनाच्या वाहतूक, महिला सुरक्षा, आमली पदार्थ विरुद्ध कारवाई व सायबर गुन्हे या चार विभागांना एक ते दहापैकी गुण द्यायचे आहेत.
- ◼️ हे अभिप्राय गोपनिय राहणार आहेत.