Vinesh Phogat :’तुझ्या यशाचा गजर दिल्लीपर्यंत पोहोचलाय’;विनेश फोगटसाठी राहुल गांधींची खास पोस्ट

राहुल गांधी यांनी आतापर्यंतच्या विजयाबद्दल विनेशचं अभिनंदन करणारी सविस्तर पोस्ट लिहिली आहे. कुस्तीपटूसह संपूर्ण देश भावूक झाला आहे, असं राहुल यांनी म्हटलं आहे.

0
Vinesh Phogat
Vinesh Phogat

नगर : भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat) हिने पॅरिसमध्ये सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत (Paris Olympic) ५० किलो फ्रीस्टाइल गटात दमदार कामगिरी करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. उपांत्य फेरीच्या सामन्यात विनेश फोगटने माजी सुवर्णपदक विजेत्या आणि जगातील नामवंत मल्लांमध्ये गणना होणाऱ्या क्युबाच्या गुझमान लोपेझ हिला अस्मान दाखवले. या विजयामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी विनेशचं कौतुक केले आहे.

नक्की वाचा : बांगलादेशमधील हिंसाचार सुरुच; ८ जणांचा मृत्यू तर ८४ जण जखमी

राहुल गांधी यांनी पोस्टमध्ये काय म्हंटलय ? (Vinesh Phogat)

विनेश फोगट हीने उपांत्य फेरीत क्युबाच्या युस्नेलिस गुझमनचा ५-० असा पराभव केला. ही कामगिरी करणारी ती पहिली भारतीय ठरली. उपांत्यपूर्व फेरीत तिनं टोकियो २०२० चॅम्पियन जपानच्या युई सुसाकीचाही पराभव केला. विशेष म्हणजे जपानच्या कुस्तीपटूला ८२ आंतरराष्ट्रीय सामन्यांतील पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागलं. राहुल गांधी यांनी आतापर्यंतच्या विजयाबद्दल विनेशचं अभिनंदन करणारी सविस्तर पोस्ट लिहिली आहे. कुस्तीपटूसह संपूर्ण देश भावूक झाला आहे, असं राहुल यांनी म्हटलं आहे.

या पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की,भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष व भाजपचे बाहुबली नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंनी केलेल्या आंदोलनाचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. ‘चॅम्पियन्सची हीच ओळख असते, ते आपलं उत्तर मैदानात देतात,असं त्यांनी म्हटलं आहे. विनेश फोगट आणि तिच्या सहकाऱ्यांच्या संघर्षाची दखल घेण्यास नकार देणाऱ्या, त्यांचा हेतू आणि क्षमतेबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना उत्तर मिळालं आहे.

अवश्य वाचा : निळवंडेच्या कालव्यातून दुष्काळग्रस्त भागाला तातडीने पाणी सोडा : आमदार थोरात

एकाच दिवसात जगातील तीन अव्वल कुस्तीपटूंना पराभूत केल्यानंतर विनेशसह संपूर्ण देश भावूक झाला आहे. ज्यांनी विनेशला रक्ताचे अश्रू ढाळायला लावणारं दु:ख दिलं, ती संपूर्ण सत्ताव्यवस्था भारताच्या या साहसी मुलीसमोर कोसळून पडली आहे, असं राहुल यांनी म्हटलं आहे. पॅरिसमधील तुझ्या यशाचा आवाज दिल्लीपर्यंत स्पष्ट ऐकू येतोय, अशा शब्दांत राहुल यांनी विनेशचं अभिनंदन केलं आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनीही विनेशचं अभिनंदन करत अंतिम फेरीतील विजयासाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

विनेश फोगटचा अंतिम सामना कुणाशी?  (Vinesh Phogat)

अंतिम सामन्यात विनेश फोगटसमोर अमेरिकेच्या सारा ॲन हिल्डब्रँडचे मोठे आव्हान असणार आहे. २०२० मध्ये खेळल्या गेलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सारा हिल्डब्रँडने ५० किलो गटात कांस्यपदक जिंकले होते. याशिवाय तिने चार वेळा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत आपल्या देशाला पदक मिळवून दिले होते. मात्र, विनेशने उपांत्य फेरीत सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या क्युबाच्या गुझमान लोपेझ हिचा पराभव केल्याने तिचा आत्मविश्वास कमालीचा दुणावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here