Sports Competition : नगर : आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे (Health) दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे महापालिकेच्यावतीन (AMC) विविध क्रीडा स्पर्धेचे (Sports Competition) आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे आपले आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यास मदत होते. खेळाच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण होत असून, स्पर्धेमुळे बालपणीच्या आठवणीला उजाळा मिळत असल्याचे प्रतिपादन महापालिकेचे उपायुक्त विजयकुमार मुंडे (Vijay Kumar Munde) यांनी केले.
नक्की वाचा : महाकुंभमेळ्यात ४५ दिवसांत बोट व्यावसायिक कुटुंबानं कमावले ३० कोटी
अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित
अहिल्यानगर महापालिका क्रीडा विभागाच्या वतीने अधिकारी, कर्मचारी क्रीडा स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपयुक्त प्रियांका शिंदे, सहाय्यक आयुक्त सपना वसावा, उपायुक्त निखिल फराटे, आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे, लेखाधिकारी डॉ. सचिन धस, क्रीडा अधिकारी फिलिप्स व्हिन्सेंट, संगणक विभाग प्रमुख ए. डी. साळी, अनिल लोंढे आदीसह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अवश्य वाचा : शेतकऱ्याने लाडक्या ‘नंद्या’ बैलाचा केला दशक्रिया विधी
स्पर्धेसह सांस्कृतिक कार्यक्रमाचे पारितोषिक वितरण (Sports Competition)
या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने भाग घेत आपल्या आवडीच्या खेळामध्ये चांगले प्रदर्शन दाखविण्याचे काम कर्मचाऱ्यांनी केले. कबड्डी स्पर्धेतील विजेता संघ प्रभाग समिती क्रमांक १ सावेडी उपविजेता संघ, शिक्षण विभाग मनपा, क्रिकेट स्पर्धेतील विजेता संघ मुख्य प्रशासकीय कार्यालय मनपा, उपविजेता संघ प्रभाग समिती क्रमांक १ सावेडी, याच बरोबर १०० मीटर, २०० मीटर, गोळा फेक, रिले, बॅडमिंटन, बुद्धिबळ, कॅरम स्पर्धेसह सांस्कृतिक कार्यक्रमाचे पारितोषिक वितरण झाले.