Sports competition| अकोले पंचायत समितीच्या महिलांनी कोरले चॅम्पियनशीप ट्रॉफीवर नाव

क्रीडा व सांस्कृतिक प्रकारांत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

0

Sports competition| अकोले: अहिल्यानगर जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2026 (Sports competition) मध्ये पंचायत समिती अकोलेच्या महिलांनी नेत्रदीपक कामगिरी करत जनरल चॅम्पियनशीप ट्रॉफीवर नाव कोरले आहे. अहिल्यानगर येथील माऊली सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांच्या हस्ते चॅम्पियनशीप ट्रॉफी प्रदान करण्यात आली.

अवश्य वाचा- अहिल्यानगर–पुणे रेल्वे डबल लाईनचा डीपीआर पूर्ण: खासदार लंके

क्रीडा व सांस्कृतिक प्रकारांत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग (Sports competition)

पंचायत समितीच्या विविध विभागातील कर्मचार्‍यांच्या समन्वयातून क्रीडा व सांस्कृतिक प्रकारांत महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत नेत्रदीपक कामगिरी केली. सामूहिक नृत्य प्रकारात प्राजक्ता मोटे, माधवी गोरे, सुनीता वलटे, स्मिता धनवटे, समता कराळे, पौर्णिमा दारोळे, विस्तार अधिकारी सविता कचरे, कृषी अधिकारी रत्नमाला शिंदे व सुमन खतोडे यांनी शिवरायांची युगत या कार्यक्रमात आपली कला सादर करून प्रथम क्रमांक पटकावला.

नक्की वाचा- जानेवारीत ग्राहकांची UPI वरून रेकॉर्ड ब्रेक सोने खरेदी; नोंदवला गेला नवा विक्रम

महिला बास्केटबॉल संघाने पटकावला प्रथम क्रमांक (Sports competition)

वैयक्तिक नृत्य स्पर्धेत प्राजक्ता मोटे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. क्रीडा प्रकारांत महिला बास्केटबॉल संघाने प्रथम क्रमांक मिळवला. टेबल टेनिस एकेरी स्पर्धेत स्मिता धनवटे यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर टेबल टेनिस दुहेरी स्पर्धेत स्मिता धनवटे व माधवी गोरे यांनी प्रथम क्रमांक मिळवून यशाची पुनरावृत्ती केली. 100 मीटर धावणे प्रकारात समता कराळे यांनी द्वितीय स्थान मिळवले, तर बॅडमिंटन दुहेरी स्पर्धेत सुनीता वलटे व स्मिता धनवटे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. विजेत्या स्पर्धकांचे गटविकास अधिकारी अमर माने, गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत यांनी विशेष कौतुक केले आहे.