Sports competition : राहुरी : खेळामुळे (Sports) आपले स्वास्थ्य चांगले राहते, आरोग्य सुदृढ होते, सांघीक भावना वृध्दींगत होऊन आत्मविश्वास (Confidence) वाढतो. यामुळे पुढील आयुष्याची वाटचाल ही प्रगतीची होते. खेळामध्ये विजय पराभव हा होतच असतो. पराभव ही यशाची पहिली पायरी समजून पुढील वर्षासाठी जय्यत तयारी करावी. या स्पर्धेच्या (competition) युगामध्ये शैक्षणीक योगदान महत्वाचे आहे. यासाठी आरोग्य सुदृढ राहणे गरजेचे आहे. हे विविध क्रीडा स्पर्धेतून साधता येते. या सर्वाचा परिपाक म्हणुन आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे (Mahatma Phule Agricultural University) कुलगुरु डॉ. विलास खर्चे (Dr. Vilas Kharke) यांनी केले.
नक्की वाचा: टी-20 विश्वचषकात आज भारत-नामिबिया भिडणार; अभिषेक शर्माच्या खेळण्याबाबत साशंकता
क्रीडा स्पर्धेचे आयोजन
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे विद्यापीठस्तरीय सन 2025-26 च्या कृषि तंत्रज्ञान शिक्षणाच्या क्रीडा स्पर्धेंचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन कुलगुरु डॉ. विलास खर्चे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, कृषि तंत्रज्ञान शिक्षणाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजु अमोलिक, काष्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज कृषि विज्ञान संकुलाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नांदगुडे, आंतरविद्या शाखा जलसिंचन विभागाचे प्रमुख डॉ. व्ही.एस. पाटील, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. विलास आवारी उपस्थित होते.
अवश्य वाचा: ‘मनभेद विसरून सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी उभे राहू’- धनंजय मुंडे
खेळाडूंनी खेळताना संघभावना व मित्रभावना जोपासावी (Sports competition)
याप्रसंगी डॉ. गोरक्ष ससाणे म्हणाले की क्रीडा स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे खिलाडूवृत्ती वाढते, शरीर तंदुरुस्त होते आणि आयुष्याला शिस्त लागते. आयुष्यामध्ये एकतरी क्रीडा प्रकारात नैपुण्य असणे गरजेचे आहे. स्पर्धेमध्ये हारजीत महत्वाची नसुन सहभाग महत्वाचा आहे. यावेळी डॉ. प्रशांत बोडके यांनी खेळाडूंना खेळताना संघभावना व मित्रभावना जोपासावी असे आवाहन केले. यावेळी प्रस्ताविक करतांना डॉ. विजु अमोलिक म्हणाले कृषि तंत्रज्ञान शिक्षणाच्या अंतर्गत 82 कृषि तंत्र विद्यालय असून या विद्यापीठ स्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये 10 संघ सहभागी झाले आहे. या स्पर्धेमध्ये 497 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. या क्रीडा स्पर्धेमध्ये खो-खो, व्हॉलीबॉल, कब्बडी, लांब उडी, उंच उडी इ. मैदानी स्पर्धेचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील खेळाडू यश काळाणे याने सर्व खेळाडूंना शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दिलीप गायकवाड यांनी तर आभार डॉ. विलास आवारी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील विभाग प्रमुख, अधिकारी, घटक विद्यालयांचे प्राचार्य, संघ प्रमुख व विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते. या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी अशोक हारदे, दत्तात्रय राजे, हेमचंद्र परदेशी, भावसाहेब बेल्हेकर यांनी परिश्रम घेतले.



