Sports-Cultural Festival : नगर : नगर विकास विभागाच्या अखत्यारित अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्हा स्तरीय नगरपरिषद व नगरपंचायतींच्या अधिकारी-कर्मचारी क्रीडा-सांस्कृतिक महोत्सावाचे (Sports-Cultural Festival) आयोजन करण्यात आले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठात (Mahatma Phule Krishi Vidyapeeth) येत्या ता.२७ ते ता.२९ डिसेंबर या कालावधीत नगर परिषद प्रशासनातील खेळाडूंचा हा महोत्सव संपन्न होणार आहे, अशी माहिती नगर परिषद प्रशासनाचे सहआयुक्त प्रशांत खांडकेकर यांनी दिली.
नक्की वाचा : सुपा एमआयडीसीतील टायर कंपनीला आग
क्रीडा स्पर्धा घेतल्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह
आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांचे निर्देशांनुसार संचालनालयाच्या राज्यस्तर, विभागस्तर, जिल्हास्तर व अधिनस्त नगरपरिषद – नगरपंचायत स्तरावरील अधिकारी-कर्मचारी यांच्याकरिता क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील नगरपरिषद-नगरपंचायतींच्या अधिकारी-कर्मचारी स्तरावर क्रीडा- सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्घाटन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमास इतर जिल्हास्तरीय अधिकारी ही उपस्थिती राहणार आहे. क्रीडा-सांस्कृतिक महोत्सवामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची शारीरिक तंदुरुस्ती व कार्यक्षमता वाढीस हातभार लागेल. क्रीडा स्पर्धा घेतल्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह येईल. त्याचा उपयोग कार्यक्षमता वाढीकरीता होईल. अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कामाचा व मानसिक ताण कमी होण्यास मदत होणार आहे. आयोजन समिती सहआयुक्त प्रशांत खांडकेकर यांच्या अध्यक्षतेखाली अहिल्यानगर स्पर्धा आयोजन समितीची स्थापना करण्यात आले आहे. देवळाली प्रवरा नगरपरिषद मुख्याधिकारी विकास नवाळे, राहुरी नगर परिषद मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपरिषद प्रशासनचे अधिकारी पाहत आहेत.
अवश्य वाचा : राज्यात पुढील तीन दिवस अवकाळी पाऊस;हवामान विभागाचा अंदाज
या खेळांचा समावेश (Sports-Cultural Festival)
स्पर्धांच्या आयोजनासाठी निवडलेले वैयक्तिक खेळ- बॅडमिंटन, टेबलटेनिस, बुद्धिबळ, कॅरम, १०० मीटर; २०० मीटर; ४०० मीटर धावणे, तीन किमी चालणे, गोळा फ़ेक, थाळी फेक, भाला फेक, फ्रीस्टाईल ५० मीटर पोहणे हे प्रकार आहेत. सांघिक खेळात क्रिकेट, रस्सी खेच, रिले ४ X १०० मीटर, बॉक्स क्रिकेट (प्रदर्शनीय महिला सहभागासह) याचा समावेश आहे. सांस्कृतिक कार्यक्रमात वैयक्तिक गायन, समूह गायन, वैयक्तिक नृत्य, सामूहिक नृत्य, प्रहसन, रांगोळी, कविता वाचन, चारोळी वाचन याचा समावेश आहे.