SRH vs RR : भुवनेश्वर कुमारची कमाल; शेवटच्या चेंडूवर रोखला राजस्थानचा विजयरथ

सनरायझर्स हैदराबादने भुवनेश्वर कुमारच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सवर एका धावेने शानदार विजय मिळवला.

0
SRH vs RR
SRH vs RR

नगर : आयपीएलच्या (IPL 2024) १७ व्या हंगामातील ५० वा सामना हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Haidarabad)आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळाली. सनरायझर्स हैदराबादने भुवनेश्वर कुमारच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सवर एका धावेने शानदार विजय मिळवला. भुवनेशने शेवटच्या बॉल मध्ये राजस्थानच्या हातून सामना हिसकावला.  

प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने नितीश रेड्डी आणि ट्रॅव्हिस हेडच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर राजस्थान समोर विजयासाठी २०२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र प्रत्युत्तरात राजस्थान संघाला यशस्वी-रियानच्या शतकी भागीदारीच्या जोरावर ७ बाद २०० धावाच करता आल्या.

नक्की वाचा : पंकजा मुंडेंसाठी मोदींची बीडमध्ये ‘या’ दिवशी सभा

राजस्थानच्या हातातून सामना सहज निसटला (SRH vs RR)

हैदराबादने दिलेल्या २०२ लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात खराब झाली. कारण संघाने एक धावेवर जोस बटलर (०) आणि कर्णधार संजू सॅमसनचे (०) विकेट गमावले. यशस्वी जैस्वाल आणि रियान पराग यांच्यातील १३३ धावांच्या भागीदारीने राजस्थानला  विजयाच्या जवळ आणले होते, तरीही संघ विजयाची नोंद करू शकला नाही. राजस्थानला शेवटच्या चेंडूवर दोन धावांची गरज होती, पण भुवनेश्वरने रोव्हमन पॉवेलला (२७) बाद करून हैदराबादला विजय मिळवून दिला.

अवश्य वाचा : देशात उष्णतेचा स्फोट! ‘या’ राज्यात आठ दिवस राहणार उष्णतेची लाट

या सामन्यात भुवनेश्वर कुमारने तीन विकेट घेत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याआधी यशस्वी जैस्वालने ४० चेंडूत ६७ धावा केल्या, ज्यात त्याने ७ चौकार आणि २ षटकार मारले. रियान परागने ४९ चेंडूत ७७ धावांची शानदार खेळी खेळली. या विजयासह हैदराबादने दोन महत्त्वाचे गुण घेतले. पॉवरप्लेमध्ये हैदराबाद संघाला दोन विकेट्सवर केवळ ३७ धावा करता आल्या. मात्र, नितीश रेड्डीसह हेडने डावाला गती दिली आणि दोन्ही फलंदाजांनी तिसऱ्या विकेटसाठी ९६ धावा जोडून हैदराबादची सामन्यात वापसी केली. दरम्यान, हेडने या हंगामातील चौथे अर्धशतक ही झळकावले. मात्र, आवेश खानने हेडला क्लीन बोल्ड करत डाव संपवला.  

नितीश रेड्डीचे अर्धशतक (SRH vs RR)

हेड बाद झाल्यानंतर नितीश रेड्डीने आपला खेळ बदलला आणि आक्रमक फलंदाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याला दुसऱ्या टोकाला असलेल्या हेनरिक क्लासेन ची चांगली साथ लाभली. नितीश आणि क्लासेनच्या स्फोटक खेळीमुळे हैदराबादने पुढील ६० चेंडूत १२६ धावा केल्या आणि फक्त एक विकेट गमावली. या काळात क्लासेन आणि नितीश यांच्यात चौथ्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी झाली. फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल या सामन्यात चांगलाच महागडा ठरला आणि त्याने चार षटकांच्या स्पेलमध्ये ६२ धावा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here