Sri Tulja Bhavani Temple :श्री तुळजाभवानी मंदिर पाईपलाईन रोड येथे पोलीस अधीक्षकांच्या हस्ते घटस्थापना

Sri Tulja Bhavani Temple :श्री तुळजाभवानी मंदिर पाईपलाईन रोड येथे पोलीस अधीक्षकांच्या हस्ते घटस्थापना.

0
Sri Tulja Bhavani Temple :श्री तुळजाभवानी मंदिर पाईपलाईन रोड येथे पोलीस अधीक्षकांच्या हस्ते घटस्थापना.

Sri Tulja Bhavani Temple : नगर : सावेडी पाईपलाईन रोड वरील श्री तुळजाभवानी मंदिर (Sri Tulja Bhavani Temple) येथे जिल्हा पोलिस अधीक्षक (Superintendent of Police) मा. श्री. राकेश ओला व सौ. ओला, तुळजाभवानी मंदिराचे संस्थापक, अध्यक्ष अशोक कानडे व सौ. सुनिता कानडे, कु. सानिका कानडे यांच्या शुभहस्ते घटस्थापना (Navratri Ghatsthapana) व तुळजाभवानी देवीची महाआरती संपन्न झाली.

Sri Tulja Bhavani Temple :श्री तुळजाभवानी मंदिर पाईपलाईन रोड येथे पोलीस अधीक्षकांच्या हस्ते घटस्थापना.

अवश्य वाचा: पुण्यात दोन चिमुरड्या मुलींवर स्कुल बस ड्रायव्हरकडून लैंगिक अत्याचार

भाविकभक्त मोठ्या संख्येने उपस्थित (Sri Tulja Bhavani Temple)

यावेळी गोपाळराव सजनुले, नवनाथ आंधळे, लक्ष्मीकांत दंडवते, ओमप्रकाश तिवारी, स्मिता शितोळे, लतिका पवार, यांच्यासह तुळजाभवानी महिला मंडळ, युवक मंडळ व पदाधिकारी, भाविकभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sri Tulja Bhavani Temple :श्री तुळजाभवानी मंदिर पाईपलाईन रोड येथे पोलीस अधीक्षकांच्या हस्ते घटस्थापना.

नक्की वाचा: दुर्गामाता दौडीत नारीलाच नाकारले,संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन (Sri Tulja Bhavani Temple)

या वर्षी मंदिरामध्ये विविध धार्मिक तसे दसऱ्याला भव्य रावण दहन व दसरा मेळावा याशिवाय दुर्गा सप्तशती पाठ, सामुदायिक कुंकूमार्चन सोहळा, नवचंडी महायज्ञ असे धार्मिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती मंदिराचे संस्थापक, अध्यक्ष अशोक कानडे यांनी दिली.

गुरुवार दि. ३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत रेणुका भजनी मंडळ व सायंकाळी ५ ते ७ यावेळेत भक्ती भजनी मंडळ यांचे भजन कार्यक्रम सादर झाले. शुक्रवार दि. ४ ऑक्टोबर रोजी दुपारी १ ते ३ या वेळेत विठ्ठल भजनी मंडळ, दुपारी ३ ते ५ या वेळेत रुक्मिणी भजनी मंडळ, सायंकाळी ५ ते ५ या वेळेत संस्कृती भजनी मंडळ यांचा कार्यक्रम सादर होणार आहे. शनिवार दि. ५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२:३० ते २:३०या वेळेत दुर्गा सप्तशती पाठ, दुपारी ३ ते ५ या वेळेत श्रुती संगीत निकेतन, सायंकाळी ५ ते ७ जीवनकला भजनी मंडळ यांचे भजन होणार आहे व रात्री ८ ते १० या वेळेत देवीची पालखी मिरवणूक होणार आहे.

रविवार दि.६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२:३० ते ३ कुंकूमार्चन सोहळा व सुवासिनी पूजन होणार आहे. दुपारी ३ ते ४:३० वा. विचार भारती आयोजित ह. भ. प. ॲड. राजश्रीताई कडलक यांचे महिला सुरक्षा या विषयावर व्याख्यान होणार आहे. सायंकाळी ५ ते ७ या वेळेत सुरवंदिता भजनी मंडळ भक्ती सुगंध ग्रुप यांचा भक्ती गीतांचा कार्यक्रम होणार आहे.

सोमवार दि. ७ ऑक्टोबर रोजी दुपारी १ ते ३ या वेळेत दुर्गा सप्तशती पाठ, दुपारी ३ ते ५ या वेळेस जय श्रीराम भजनी मंडळ व सायंकाळी ५ ते ७ या वेळेत स्वरा आनंद भजनी मंडळ यांचे भजन सादर होणार आहे. मंगळवार दि.८ ऑक्टोबर रोजी दुपारी १ ते ३ या वेळेस सामुदायिक दुर्गा सप्तशती पाठ, दुपारी ३ ते ५ दुर्गा भजनी मंडळ, सायंकाळी ५ ते ७ ज्ञान माऊली भजनी मंडळ व सायंकाळी ८:३० ते ९:३० भरतनाट्यम नृत्य सेवा होणार आहे.

बुधवार दि. ९ ऑक्टोबर रोजी दुपारी १ ते ३ या वेळेत अंबिका भजनी मंडळ, दुपारी ३ ते ५ या वेळेत नामदेव भजनी मंडळ, सायंकाळी ५ ते ७ यावेळी जीवेश्वर भजनी मंडळ व रात्री ७ ते ९ या वेळेत माता की चौकी हा कार्यक्रम सादर होणार आहे. गुरुवार दि. १० ऑक्टोबर रोजी दुपारी १ ते ३ सोहमनाथ प्रस्तुत देवीच्या जागर, दुपारी ३ ते ५ राधे राधे भजनी मंडळ व सायंकाळी ५ ते ७ या वेळेत ह. भ. प. सतीश कुलकर्णी यांचे कीर्तन होणार आहे. शुक्रवार दि. ११ ऑक्टोबर रोजी दुपारी २ ते रात्री ८ वाजेपर्यंत नवचंडी महायज्ञ होणार आहे. शनिवार दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता सामुदायिक शस्त्र पूजन सोहळा सायंकाळी ६ वाजता सीमोल्लंघन व सायंकाळी ८ वाजता विजयादशमी महोत्सव व भव्य रावण दहन सोहळा होणार आहे. दि. 3 ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीमध्ये दररोज पहाटे ४ वा. महा अभिषेक व सकाळी ७, दुपारी १२ व सायंकाळी ७:३० वा. महाआरती होणार आहे.

भव्य दिव्य मंडप, देवीच्या गाभाऱ्यात केलेली आकर्षक रंगीबेरंगी फुलांची सजावट, डोळ्यांचे पारणे फेडणारी आकर्षक प्रकाशयोजनामुळे मंदिर परिसरात नवचैतन्य निर्माण झाले आहे. परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तुळजाभवानी महिला मंडळ, युवक मंडळ व पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.