Srigonda Municipality : अखेर तिसऱ्या दिवशी श्रीगोंदा पालिका कामगारांचे उपोषण मागे

Srigonda Municipality : अखेर तिसऱ्या दिवशी श्रीगोंदा पालिका कामगारांचे उपोषण मागे

0
Srigonda Municipality : अखेर तिसऱ्या दिवशी श्रीगोंदा पालिका कामगारांचे उपोषण मागे
Srigonda Municipality : अखेर तिसऱ्या दिवशी श्रीगोंदा पालिका कामगारांचे उपोषण मागे

Srigonda Municipality : श्रीगोंदा : येथील नगरपालिकेच्या (Srigonda Municipality) आरोग्य विभागातील कंत्राटी कामगारांचे (Workers) पगार व इतर मागण्यांसाठी तीन दिवसांपासून सुरू असलेले उपोषण आज अखेर मागे घेण्यात आले. भाजप (BJP) युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते (Vikramsinh Pachpute) यांनी यशस्वी मध्यस्थी करत नगरपालिकेचे मुख्याध्याकारी तसेच ठेकेदार यांच्याशी चर्चा करत दोन महिन्याचा थकीत पगार देण्याचे ठेकेदाराने कबूल केल्यानंतर पालिका कामगारांकडून उपोषण स्थगित करण्यात आले.

नक्की वाचा: राज्य सरकारचा मोठा निर्णय,१११ पोलीस निरीक्षकांच्या केल्या बदल्या

कामगारांचा तीन महिन्यांपासून थकला होता पगार

श्रीगोंदा नगरपरिषदेतील आरोग्य विभागातील कंत्राटी कामगारांचा कंत्राटी एजन्सीला शासनाचा निधी न मिळाल्याने मागील तीन महिन्यांपासून पगार थकला होता. तसेच पीफ फंड, सुरक्षा किट पुरवावे अश्या मागणीसाठी ६७ कामगार मागील तीन दिवसांपासून नगरपालिकेसमोर उपोषण करत होते. या उपोषणाची दखल भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते यांनी घेऊन उपोषणस्थळी कामगारांची भेट घेत नगरपालिकेचे मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत तसेच आरोग्य विभागाचे काम घेतलेले ठेकेदार यांच्याशी चर्चा केली. चर्चेअंती नगरपरिषद आणि ठेकेदाराने कामगारांना दोन महिन्याचे थकीत पगार पुढील आठवड्यात जमा करणार असल्याचे कबूल करत उर्वरित पगार शासनाकडून निधी आला तर देणार अथवा दिवाळीसाठी ५ हजार रुपयांची उचल देणार असल्याचे कबूल केल्याने कामगारांनी शनिवारी दुपारी उपोषण मागे घेतले.

अवश्य वाचा: प्राजक्ता माळीच्या ‘फुलवंती’ चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

विक्रमसिंह पाचपुते यांनी यशस्वी मध्यस्थी (Srigonda Municipality)

कामगारांचे उपोषण सोडविण्यात विक्रमसिंह पाचपुते यांनी यशस्वी मध्यस्थी केली. काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार यांनी कामगारांची भेट घेतली. यावेळी दत्ता हिरणावळे, बाळासाहेब शेलार, बापू गोरे, संदीप नागवडे, अशोक खेंडके, राजेंद्र उकांडे, रमेश लाढाणे, सुनील वाळके, संग्राम घोडके, धनंजय कोथंबिरे, अंबादास औटी, संजय खेतमाळीस, नंदकुमार ससाणे यांच्यासह आरोग्य विभागातील कंत्राटी कामगार उपस्थित होते.