Srigonda-Pargaon Road : उपोषणानंतर पालिका हद्दीतील श्रीगोंदा-पारगाव रस्त्याचे काम सुरू

Srigonda-Pargaon Road : उपोषणानंतर पालिका हद्दीतील श्रीगोंदा-पारगाव रस्त्याचे काम सुरू

0
Srigonda-Pargaon Road : उपोषणानंतर पालिका हद्दीतील श्रीगोंदा-पारगाव रस्त्याचे काम सुरू
Srigonda-Pargaon Road : उपोषणानंतर पालिका हद्दीतील श्रीगोंदा-पारगाव रस्त्याचे काम सुरू

Srigonda-Pargaon Road : श्रीगोंदा : नगरपरिषद (Shrigonda Municipal Council) हद्दीतील पारगाव रस्ता (Srigonda-Pargaon Road) ते बाजारतळ हा दयनीय झालेला रस्ता दुरुस्त करून जलद कॉंक्रिटीकरण करण्याच्या मागणीसाठी टिळक भोस (Tilak Bhos) व सतीश बोरुडे यांनी तहसील कार्यालयासमोर सुरू केलेल्या उपोषणानंतर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात करण्यात आली. तर आठ दिवसात रस्त्याचे कॉंक्रिटीकरण सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.

अवश्य वाचा : भारताच्या पोरी जगात भारी; विश्वचषकावर कोरलं नाव!

खड्ड्यांमुळे अनेक अपघात

तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या पारगाव-श्रीगोंदा रस्त्याची पालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात दळणवळण असून अनेक दिवसांपासून या रस्त्याची दुरुस्ती झाली नसल्याने मोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत असल्याने रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी अनेक वेळा होत आहे.

नक्की वाचा : जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या तीन खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड

लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे (Srigonda-Pargaon Road)

मात्र, काम सुरू होत नसल्याने टिळक भोस व सतीश बोरुडे यांनी तहसील कार्यालयासमोर श्रीगोंदा नगरपरिषद हद्दीतील पारगाव रस्ता ते बाजारतळ या दयनीय झालेल्या रस्त्याची दुरुस्ती करून जलद कॉंक्रिटीकरण करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू करताच कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कडून रस्त्यावर मुरूम टाकत खड्डे बुजविण्यास सुरुवात करून आठ दिवसात रस्त्याचे कॉंक्रिटीकरण सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी विशाल सकट, गणेश काळे, झहीर जकाते, नवनाथ दरेकर, प्रवीण काळे, युवराज साबळे उपस्थित होते.