SSC Exam Result 2024:मोठी बातमी! दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर; कोकण विभाग सर्वात अव्वल

यंदाच्या निकालामध्ये कोकण विभागानं बाजी मारली असून नागपूर विभाग मात्र तळाशी आहे. नागपूर विभाग ९४. ७३ टक्क्यांसह राज्यातील विभागनिहाय टक्केवारीनुसार सर्वात खाली आहे.

0
SSC Exam Result 2024
SSC Exam Result 2024

नगर : विद्यार्थी ज्या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते अखेर तो दहावीचा निकाल (SSC Result) लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra Board SSC Result LIVE) घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. दहावीचा यंदाचा एकूण निकाल ९५. ८१  टक्के इतका लागला आहे. निकाल जाहीर करण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीनं पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेतून निकालासंदर्भातील ठळक माहिती देण्यात आली आहे.

नक्की वाचा : कोलकाताची तिसऱ्यांदा ‘आयपीएल’च्या जेतेपदावर मोहोर; हैदराबादला नमवले

निकालामध्ये कोकण विभागाची बाजी तर नागपूर विभाग तळाशी (SSC Exam Result 2024)

यंदाच्या निकालामध्ये कोकण विभागानं बाजी मारली असून नागपूर विभाग मात्र तळाशी आहे. नागपूर विभाग ९४. ७३ टक्क्यांसह राज्यातील विभागनिहाय टक्केवारीनुसार सर्वात खाली आहे. तर निकालांमध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९७.२१ टक्के तर मुलांचा निकाल ९४.५६ टक्के लागला आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, सर्वच विभागांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. एकूण ७२ विषयांपैकी १८ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. मंडळाच्या ९ विभागीय मंडळामार्फत १ ते २६ मार्च दरम्यान लेखी परीक्षा घेण्यात आली होती. यंदा दहावीच्या परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांच्या निकालाची एकूण टक्केवारी ९४. ८६ टक्के आहे.

अवश्य वाचा : भारताच्या अनसूया सेनगुप्ताने रचला इतिहास; कान्समध्ये मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार (SSC Exam Result 2024)

शैक्षणिक वर्ष २०२३ -२०२४ मध्ये दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. दहावीच्या परीक्षेसाठी १६ लाख ९ हजार ५४४  विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या सर्व विद्यार्थ्यांसह पालकांची ही निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता दुपारी एक वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर हे निकाल जाहीर केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना एक वाजल्यापासून निकाल पाहता येतील, तसेच, निकालाची प्रत विद्यार्थी डाऊनलोडही करू शकणार आहेत.

दहावीचा निकाल कुठे पाहाल? 

https://mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org  
https://sscresult.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
https://results.targetpublications.org/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here