नगर : मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी एसटी (ST) महामंडळातर्फे अहिल्याबाई हाेळकर (Ahilyabai Holkar) याेजनेंतर्गत मोफत प्रवास सवलत पास दिला जाताे. या याेजनेंतर्गत पाचवी ते बारावीच्या मुलींचा समावेश आहे. यंदाच्या शैक्षणिक (Educational) वर्षात नगर जिल्ह्यातील २९ हजार १०२ विद्यार्थिनींनी माेफत पास याेजनेचा लाभ घेतला आहे.
अहिल्याबाई होळकर योजनेच्या माध्यमातून राज्यातील विद्यार्थिनींना मोफत पास पुरवले जात आहेत. यंदा गतवर्षीपेक्षा पास घेणाऱ्या मुलींची संख्या वाढली आहे. राज्य परिवहन महामंडळातर्फे प्रवासी वाढवण्यासाठी विविध सवलतीच्या योजना राबवल्या जातात. त्याचाच भाग म्हणून मागील वर्षापासून महिलांना अर्धे तिकीट करण्यात आले. दरम्यान, विद्यार्थिनींसाठी मोफत पासची सुविधा महामंडळातर्फे गेल्या दहा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेली आहे. यात ५ वी ते १२ वी पर्यंतच्या मुलींचा समावेश आहे. दर तीन महिन्यांनी हा पास नूतनीकरण करावा लागताे.
ज्या शाळांमध्ये मुलींची संख्या ५० ते १०० पेक्षा अधिक आहे. त्या ठिकाणी संबंधित आगाराचे अधिकारी जाऊन त्यांनी जागेवरच पास वितरित केले आहेत.