ST : नगर : एकीकडे पावसाची (Rain) दमदार सुरुवात झाल्याने बळीराजा सुखावला असून पेरणीच्या कामाची तयारी करत आहेत. पेरणीनंतर वारकरी, शेतकरी विठूरायाच्या दर्शनासाठी निघणार आहे. दुसरीकडे पंढरीच्या वारीसाठी (Pandharpur Wari) एसटी प्रशासनाकडून तयारी सुरू झाली आहे. श्री श्रेत्र पंढरपूरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी एसटीने (ST) यात्राकाळात विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे.
नक्की वाचा: आम्हांला जनतेचा कौल मान्य : सुजय विखे पाटील
एकत्रित मागणी केल्यास गावातून एसटी बस उपलब्ध
विशेष म्हणजे यंदा जिल्ह्यातून कोणत्याही गावातून भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
अवश्य वाचा : ‘त्या’ कुटुंबीयांना पराभवच मान्य नाही : खासदार लंके
थेट गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध (ST)
अनेक प्रवाशी स्वत:च्या खासगी वाहनाने, रेल्वेने, एसटीने अथवा विविध पालखींबरोबर चालत दिंडीने येतात. या प्रवाशांना एसटीने यंदापासून c करून दिली जाणार आहे. भाविक प्रवाशांची संख्या असल्यास त्यांना त्यांच्या गावापासून विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा, यासाठी जास्तीत-जास्त नागरिकांनी एसटी बसनेच प्रवास करावा, असे आवाहन विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी केले.