ST : बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात नगर विभागाचा डंका

ST : बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात नगर विभागाचा डंका

0
ST : बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात नगर विभागाचा डंका
ST : बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात नगर विभागाचा डंका

ST : नगर : राज्य परिवहन महामंडळातर्फे (MSRTC) मागील आर्थिक वर्षात राज्यभरात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान राबविण्यात आले. वर्षभरात या अभियानातील स्पर्धेदरम्यान चार वेळेस बसस्थानकांचे मूल्यांकन करण्यात आले. या अभियानाचा अंतिम निकाल एसटी (ST) प्रशासनाकडून घोषित करण्यात आला आहे. या अभियानात ‘अ’ वर्गात नाशिक प्रदेश पातळीवर संगमनेर बसस्थानकाने द्वितीय, तर कोपरगाव बसस्थानकाने तृतीय क्रमांक मिळवला. ‘ब’ वर्गामध्ये नाशिक प्रदेशात लोणी बसस्थानकाने द्वितीय आणि राहाता बसस्थानकाने तृतीय क्रमांक पटकावला आहे, अशी माहिती नगर विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी दिली. 

ST : बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात नगर विभागाचा डंका
ST : बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात नगर विभागाचा डंका

अवश्य वाचा : लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली;दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल

नगर जिल्ह्यातील २८ बसस्थानकांनी सहभाग नोंदवला

नगर विभागाच्या कार्यालयात आयाेजित पत्रकार परिषदेत त्या बाेलताना हाेत्या. यावेळी विभागीय अभियंता राम राशीनकर, विभागीय कामगार अधिकारी बाळासाहेब एकशिंगे, उपअभियंता संजय दरेकर, सहायक वाहतूक अधीक्षक अविनाश कल्हापुरे आदी उपस्थित होते. सपकाळ म्हणाल्या, ”राज्य परिवहन महामंडळाने १ मे २०२३ ते ३० एप्रिल २०२४ या काळात महाराष्ट्रातील सर्व बसस्थानकावर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान राबवले. या स्पर्धेत राज्यातील ५६३ बसस्थानकांनी, तर नगर जिल्ह्यातील ११ आगाराअंतर्गत असलेल्या २८ बसस्थानकांनी सहभाग नोंदवला.

ST : बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात नगर विभागाचा डंका
ST : बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात नगर विभागाचा डंका

नक्की वाचा : ‘उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा’- संजय राऊत

जिल्ह्यातील तब्बल १५ बसस्थानकांची रंगरंगोटी आणि स्वच्छता (ST)

या स्पर्धेदरम्यान बसस्थानकांचे अ, ब, क अशा वर्गवारीनुसार मूल्यांकन करण्यात आले. बसस्थानकांची स्वच्छता, एसटी बसेसची स्वच्छता, आगाराची स्वच्छता, प्रवाशांच्यासाठी असलेल्या स्वच्छतागृह आदी सुविधा, खुल्या जागेतील वृक्षारोपण या महत्त्वाच्या मुद्द्यांवर गुण निश्चित करण्यात आले होते. या अभियानात जिल्ह्यातील तब्बल १५ बसस्थानकांची रंगरंगोटी आणि स्वच्छता स्थानिक लोकसहभागातून करण्यात आली. लोकसभागातून अंदाजे ५० लाख रुपयांचे सूशोभिकरणाचे आणि सुविधेचे काम उभे राहिले. या स्पर्धात्मक अभियानात नगर विभागातील चार बसस्थानकांनी प्रदेश पातळीवरील पुरस्कार पटकावले.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here