ST Bus : एसटी अपघाताचे प्रमाण अवघे ०.१९ टक्के – अमृता ताम्हणकर

ST Bus : एसटी अपघाताचे प्रमाण अवघे ०.१९ टक्के - अमृता ताम्हणकर

0
ST Bus :एसटी अपघातेच प्रमाण अवघे ०.१९ टक्के - अमृता ताम्हणकर
ST Bus :एसटी अपघातेच प्रमाण अवघे ०.१९ टक्के - अमृता ताम्हणकर

ST Bus : नगर : एसटी बसमधील (ST Bus) प्रवाशांची व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबांची संख्या लक्षात घेतली तर एसटी कर्मचाऱ्यांच्या जबाबदारीचे गांभीर्य वाढते. एक लाख किलोमीटर मागे एसटी अपघाताचे (Accident) प्रमाण अवघे ०.१९ टक्के एवढे आहे. अपघातच होऊ नये यासाठी रस्ता सुरक्षा नियमांचे (Road Safety Rules) पालन करण्याबरोबरच वाहन चालकाचे मन प्रसन्न अन् मानसिकता सकारात्मक असेल तर अपघात टळतील, असा विश्वास राज्य परिवहन महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हणकर यांनी व्यक्त केला.

ST Bus :एसटी अपघातेच प्रमाण अवघे ०.१९ टक्के - अमृता ताम्हणकर
ST Bus :एसटी अपघातेच प्रमाण अवघे ०.१९ टक्के – अमृता ताम्हणकर

नक्की वाचा : ‘विधानसभेला ते तिन्ही पक्ष स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू,चिंता नाही’-राधाकृष्ण विखे पाटील

‘राष्ट्रीय रस्ता सुरक्षा’ अभियानाचे आयोजन

राज्य परिवहन महामंडळांतर्गत १ ते ३१ जानेवारी दरम्यान ‘राष्ट्रीय रस्ता सुरक्षा’ अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. अहिल्यानगर विभागांतर्गत तारकपूर आगारात या अभियानाचे उद्घाटन शनिवारी (ता. ११) ताम्हणकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रियंका उनवणे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब परदेशी, विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप, विभागीय वाहतूक अधिकारी रामनाथ मगर, तारकपूर आगार व्यवस्थापक अभिजित चौधरी, विभागीय स्थापत्य अभियंता कैलास काळभोर, विभागीय सांख्यिकी अधिकारी मयुरी दिकोंडा, पत्रकार महेश देशपांडे महाराज आदी उपस्थित होते.प्रियंका उनवणे म्हणाल्या, नियमांकडे दुर्लक्ष हेच रस्ता अपघाताचे प्रमुख कारण आहे. सुरक्षेच्या आणि वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे काळजी घेतली तर अपघात आणि त्यात होणारी दुर्दैवी जीवतहाणी टळेल. १५-२० हजारांच्या मोबाईलला स्क्रीनगार्ड लावण्याची काळजी घेतली जाते. मात्र, वाहन चालवताना सीट बेल्ट, हेल्मेट, वेगाच्या बाबतीतील संयम या स्वतःसह इतरांसाठी असलेल्या ‘रुल गार्ड’चे भान बाळगले जात नसल्याची खंत, त्यांनी व्यक्त केली. 

अवश्य वाचा : मोठी बातमी!पंजाबमधील आप आमदाराचा गोळी लागून मृत्यू

राजेंद्र जगताप म्हणाले,

वाहने चालवताना चालक तसेच प्रवासी नागरिकांना नियमांची उजळणी व्हावी म्हणून दरवर्षी राज्य परिवहन महामंंडळांतर्गत रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन केले जाते. हा नियम प्रत्येकाला माहिती असतात. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होते. त्या नियमांच्या उजळणीचा वर्ग म्हणजे हे अभियान होय. नियम पाळा, अपघात टाळा हा या अभियानाचा संदेश आहे. यावेळी प्रा. भुपेंद्र निकाळजे व पत्रकार महेश महाराज यांनीही समयोचित मनोगत व्यक्त केले.तारकपूर आगार व्यवस्थापक चौधरी यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. या कार्यक्रमात विनाअपघात सेवा देणाऱ्या बिभीषण गणपत गाडेकर, आंबादास लक्ष्मण निमसे, शिवाजी हौसराव सांगळे, अरुण लक्ष्मण आव्हाड, रफिक बाबूमिया देशमुख, बंडू चंद्रभान धामोरे, पाटीलबा ममताजी एकशिंगे, राजेंद्र जगन्नाथ त्रिमुखे यांचा विशेष गौरव करण्यात आला.