ST Bus : अकोले : डी. वाय. एफ. आय. या युवक संघटनेच्यावतीने मंगळवारी (ता.१५) राजूर बसस्थानक (Rajur Bus Stand) येथे अकोले (Akole) – राजूर परिसराची बससेवा (ST Bus) सुधारण्यासाठी जोरदार आंदोलन करण्यात आले.
अवश्य वाचा : श्रीरामपूर काँग्रेसच्या नेत्यांच्या हाती कमळ; मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात भाजपात प्रवेश
युवकांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला मोर्चा
राजूर येथील दत्त मंदिर याठिकाणावरून युवकांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. विद्यार्थी रोज शाळा, कॉलेजसाठी मोठ्या संख्येने राजूर येथे एसटी बसमधून येत असतात. मात्र, या विद्यार्थ्यांना वेळेत बस न आल्यामुळे मोठ्या शैक्षणिक नुकसानास सामोरे जावे लागते. येथील बसस्थानकाची व येथील स्वच्छतागृहाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. सोडण्यात येत असलेल्या बसेस अत्यंत निकृष्ट व खराब आहेत. विद्यार्थी युवकांबरोबरच रोजगारासाठी व बाजारासाठी येणाऱ्या सामान्य गरीब जनतेचेही यामुळे मोठ्या प्रमाणात हाल होत असतात. डी. वाय. एफ. आय. या संघटनेने याकामी पुढाकार घेऊन आंदोलनाची हाक दिली होती. मोठ्या प्रमाणात जनतेमधून सह्या गोळा करून या आंदोलनाची तयारी करण्यात आली होती.
नक्की वाचा : काळभैरवनाथांचा रविवारी आगडगावला यात्रोत्सव
मागण्या यावेळी मान्य करण्यात आल्या (ST Bus)
एसटी महामंडळाच्यावतीने वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. १५ दिवसांत अधिकच्या बस उपलब्ध होतील, फेऱ्यांची जशी मागणी असेल तशा गाड्या सोडण्यात येतील, नव्या १० बस गाड्या नवीन मिळणार, जूनपासून नवीन वेळापत्रक तयार होऊन बसेस वेळेनुसार चालू करण्यात येतील, पाचपट्टा घाटघर गाडी चालू करू, सूचना फलक लावण्याची जबाबदारी घेणार, गाड्यांची चौकशी करूनच गाड्या पाठविल्या जातील, स्वछतागृहाची व्यवस्था करणार, राजूर – पिंपरकणे – टिटवी बस चालू करण्यासाठी सर्वे झाला आहे, गाड्या उपलब्ध झाल्यास लगेच चालू होईल, बलठण बस चालू करण्याबाबद सकारात्मक चर्चा, संध्याकाळी बस सोडण्याबाबत चर्चा झाली, कुमशेत गाडीबाबत चर्चा करून मार्ग काढू, अकोले – देवठाण – दोडकनदी – सावरगाव चालू करणेबाबत रस्त्याची पाहणी करून बस चालू करू असे सांगण्यात आले, कोहंडी रस्त्याचे सर्वेक्षण करून नवीन बस आल्यावर चालू होईल, पुरुषवाडी संध्याकाळी बस लगेच सोडणार या मागण्या यावेळी मान्य करण्यात आल्या. या आंदोलनात वसंत वाघ, सुनील बांडे, भीमा कोंडार, गोरख आगिवले, दत्ता कोंढार, विष्णू भांगरे आदी सहभागी झाले होते. तर एकनाथ मेंगाळ, नामदेव भांगरे, लक्ष्मण घोडे, कुसा मधे, राजाराम गंभीरे, पांडुरंग गिरे यांनी सहकार्य केले.