ST Bus : श्रीगोंदा शहरातील मुख्य चौकात एस टी बंद पडल्याने वाहतुकीचा खोळंबा

ST Bus : श्रीगोंदा शहरातील मुख्य चौकात एस टी बंद पडल्याने वाहतुकीचा खोळंबा

0
ST Bus : श्रीगोंदा शहरातील मुख्य चौकात एस टी बंद पडल्याने वाहतुकीचा खोळंबा
ST Bus : श्रीगोंदा शहरातील मुख्य चौकात एस टी बंद पडल्याने वाहतुकीचा खोळंबा

ST Bus : श्रीगोंदा : राज्य परिवहन मंडळाच्या (MSRTC) वाहतूक सेवेचा श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यात बोजवारा उडाला असून शुक्रवारी (ता.२५) सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास शहरातील मुख्य गजबजलेला चौक असलेल्या शनी चौक परिसरात एस टी बस (ST Bus) बंद पडल्याने वाहतुकीचा खोळंबा होऊन चौकात ट्रॅफिक जाम झाली होती. चालकाने बस सुरु करण्याचा प्रयत्न केला. पण बस सुरुच होत नसल्यानं गाडीतील प्रवाशांसह नागरिकांवर बस ढकलण्याची वेळ आली.

नक्की वाचा : धुळ्यात राडा;माणिकराव कोकाटेंच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे

परिवहन विभागाची मुदत संपलेल्या गाडीने प्रवास

राज्य परिवहन मंडळाच्या नादुरुस्त तसेच परिवहन विभागाची मुदत संपलेल्या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येत असताना प्रवाशांना नादुरुस्त गाड्यांचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. श्रीगोंदा डेपोची बस डेपोपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या शहरातील शनी चौक परिसरातून जात असताना शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास नादुरुस्त होऊन बंद पडली. ड्रायव्हरनं बस सुरु करण्याचा बराच वेळ प्रयत्न केला. पण बस सुरुच होत नसल्याने गाडीतील प्रवाशांसह जवळच उभे असलेले पांडुरंग पोटे, निखिल पोटे, तुषार पोटे, बंटी कवडे, नीलेश पोटे यांच्यासह नागरिकांवर बस ढकलण्याची वेळ आली.

अवश्य वाचा : कर्जत तालुका प्रशासनाने राशीन प्रकरणात सर्वसमावेशक तोडगा काढला

प्रवाशांना नादुरुस्त गाड्यांचा मनस्ताप (ST Bus)

शनी चौक परिसर हा शहरातील मुख्य चौक असून या चौकात पोलीस ठाणे, तहसील कार्यालय, पंचायत समिती यासारखील शासकीय कार्यालये असल्याने या परिसरात कायम नागरिकांची गर्दी असते. बस बंद पडल्याने या परिसरात वाहतुकीचा खोळंबा होऊन चौकात ट्रॅफिक जाम झाल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागलं. बस डेपोत ६० गाड्या असून काही दिवसांपूर्वी आलेल्या पाच नव्या बस लांबच्या पल्ल्यासाठी वापरल्या जात आहेत. तर उर्वरित गाड्याची मुदत आरटीओ नियमानुसार तसेच महामंडळाच्या नियमानुसार संपली आहे. या वाहनांची मुदत १२ वर्ष किंवा १२ लाख किमीपर्यंत असताना यातील गाड्यांची सेवा ही १५ वर्षापेक्षा जास्त झाली आहे. या गाड्यांना तात्पुरती डागडुजी जवळच्या प्रवासासाठी पाठवण्यात येत आहे. अनेक वेळा जुन्या झालेल्या गाड्या प्रवासात नादुरुस्त होऊन अचानक बंद पडत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.