ST Bus : एसटी बसचालकाला मारहाण; गुन्हा दाखल

ST Bus : एसटी बसचालकाला मारहाण; गुन्हा दाखल

0
ST Bus : एसटी बसचालकाला मारहाण; गुन्हा दाखल
ST Bus : एसटी बसचालकाला मारहाण; गुन्हा दाखल

ST Bus : नगर : अहिल्यानगर शहरातील (Ahilyanagar City) स्वस्तिक चौकातील पुणे बसस्थानकात एका एसटी बस (ST Bus) चालकाला शिवीगाळ करत मारहाण (Beating) केल्याची घटना समोर आली आहे. तसेच बसच्या काचेवर दगड फेकून नुकसान केले. ही घटना बुधवारी (ता. २९) पहाटे ४.४५ च्या सुमारास घडली.

नक्की वाचा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटच्या वापराबाबत कायद्यात तरतूद नाही

कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद

या प्रकरणी रोहन भाऊसाहेब वाघमारे (रा. वाघ गल्ली, नालेगाव) याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बस चालक अजिनाथ महादेव नाकाडे (वय ३५, रा. संभाजीनगर, वाघोली, पुणे) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अवश्य वाचा: लाडक्या बहिणींना आता शेवटची संधी, E-KYC ची मुदत काही दिवसातच संपणार

दुचाकी बाजुला घ्या म्हणल्याचा राग (ST Bus)

फिर्यादी हे ९ वर्षांपासून बस चालक म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी (ता. २९) पहाटे २ च्या सुमारास त्यांना छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती बसस्थानक येथून शेगाव-पुणे जाणाऱ्या एस टी बसवरती चालक म्हणुन ड्युटी असल्याने ते प्रवासी घेऊन पुणे रोड बसस्थानक स्वस्तिक चौक अहिल्यानगर येथे पहाटे आले. पहाटे ४.४५ च्या सुमारास पुणे बसस्थानक, स्वस्तिक चौक येथे प्रवाशांना सोडुन त्यांनी बस नोंद केली. बसस्थानकाचे बाहेर येत असताना दोन इसम वाटेत त्याच्याकडील दुचाकीवर बसलेले होते. त्यावेळी चालक नाकाडे यांनी त्यांना दुचाकी बाजुला घ्या, बस वळवण्यास अडचण होत आहे, असे म्हणाले. याचा राग आल्याने फिर्यादीस शिवीगाळ करत मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.