ST Bus : प्रवासात सुट्ट्या पैशांची चिंता मिटली; प्रवाशांच्या सेवेत डिजिटल तिकीट

ST Bus : प्रवासात सुट्ट्या पैशांची चिंता मिटली; प्रवाशांच्या सेवेत डिजिटल तिकीट

0
ST Bus : प्रवासात सुट्ट्या पैशांची चिंता मिटली; प्रवाशांच्या सेवेत डिजिटल तिकीट
ST Bus : प्रवासात सुट्ट्या पैशांची चिंता मिटली; प्रवाशांच्या सेवेत डिजिटल तिकीट

ST Bus : नगर : एसटीतून (ST Bus) प्रवास करताना प्रवाशांना आता तिकिटासाठी सुट्या पैशांची चिंता नको. महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत सर्व वाहकांसाठी डिजिटल प्रणालीद्वारे (Digital system) तिकीट खरेदी करता येईल. नगर जिल्ह्यात एकूण १४७० ॲण्ड्राईड तिकीट इश्यू मशिन्स (Android Ticket Issuing Machines) नव्याने सेवेत दाखल झाल्या आहेत. या मशिनमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान रोख पैशांऐवजी यूपीआय, क्यूआर कोड (QR code) आदी डिजिटल पेमेंटचा वापर करत तिकीट काढता येणार आहे.

हे देखील वाचा : अयाेध्येतील श्रीरामाच्या दरबारासाठी तब्बल इतक्या किलाेची महाकाय घंटा; देशभरात चर्चा

ईबीक्सकॅश मोबिलिटी सॉफ्टवेअर लिमिटेड यांच्या सहकार्याने एसटी महामंडळाने नवीन ॲण्ड्राईड आधारित डिजिटलची सुविधा असणाऱ्या तिकीट मशिन घेतल्या आहेत. सध्या रोखीने व्यवहार होण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. तसेच डिजिटल व्यवहाराला चालना देणे हे पंतप्रधानांचे स्वप्न आहे. त्या दृष्टिकोनातून एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत प्रवासादरम्यान प्रवाशांना बसमध्ये तिकीट काढण्यासाठी यूपीआय पेमेंटसाठी वाहकाकडे असलेल्या ॲण्ड्राईड तिकीट मशिनवर असलेल्या क्यूआर कोडद्वारे प्रवाशांना तिकिटाचे मोजके पैसे डिजिटल स्वरूपात देणे शक्य आहे.

नक्की वाचा : बलात्काराचा धाक दाखवून जबरी चोरी

प्रवाशांना खिशात रोख पैसे नाहीत म्हणून एसटीने प्रवास करणे टाळणे, तसेच सुट्या पैशांसाठी वाहकाशी होणारा विनाकारण वाद, असे प्रश्न कायमचे मिटू शकतात. यूपीआय पेमेंटद्वारे क्यूआर कोडच्या माध्यमातून एसटीच्या सर्व प्रकारच्या बससेवेमध्ये तिकीट विक्री सुरू केली असून जास्तीत-जास्त प्रवाशांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाचे नगर विभागातील विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here