ST Bus : बॉम्बच्या अफवेने ‘लालपरी’ कर्जतमध्येच रोखली

ST Bus : बॉम्बच्या अफवेने 'लालपरी' कर्जतमध्येच रोखली

0
ST Bus
xr:d:DAF5Y3epXKI:869,j:2866964883531950896,t:24040315

ST Bus : कर्जत : पुणे स्वारगेट – जामखेड बसमध्ये बॉम्ब (Bomb) असल्याच्या एका कॉलने पोलीस (Police) प्रशासनासह प्रवाशांची चांगलीच धांदल उडवली. प्रवासी खाली उतरत बसची पाहणी केली असता शेवटी ही अफवाच (Rumours) निघाल्याने ती बस (ST Bus) जामखेडच्या दिशेने रवाना करण्यात आली. जामखेड आगारास कॉल करणाऱ्या युवकांस जामखेड पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मारुती मुलूक यांनी दिली. 

नक्की वाचा: नगरकरांवर पाणी कपातीचे संकट

प्रवाशांना तात्काळ उतरवले खाली

पुणे स्वारगेट-कर्जत-जामखेड ही जामखेड आगाराची बस जामखेडच्या दिशेने कर्जतहून रवाना झाली. अज्ञात युवकाने त्या बसमध्ये बॉम्ब असल्याचा कॉल जामखेड आगारास केला. त्यानुसार आगार चालकाने ही माहिती बसचालक आणि वाहकास मोबाईलद्वारे दिली. प्रवाशांना तत्काळ खाली उतरवत त्यांना सुरक्षित स्थळी नेण्यात यावे, असे सांगितले.

हे देखील वाचा: सुप्याच्या एमआयडीसीत खंडणी बहाद्दर गोळा झालेत – राधाकृष्ण विखे पाटील

संपूर्ण तपासणीनंतर सोडला सुटकेचा निश्वास (ST Bus)

त्यानुसार चालक उत्तम क्षीरसागर आणि वाहक विनायक गोरे यांनी कर्जत उपनगराच्या बोथरा एजन्सीजवळ बस तत्काळ थांबवत प्रवासी खाली घेत असताना कर्जतचे पोलीस निरीक्षक मारुती मुलूक आपल्या फौजफाट्यासह त्या ठिकाणी आले. त्यांनी संपूर्ण बसची पाहणी केली असता त्यामध्ये बॉम्ब अथवा बॉम्ब सदृश वस्तू आढळून न आल्याने त्याची पूर्ण खातरजमा करीत सुटकेचा निश्वास टाकला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here