ST Bus : नगर : यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून (Academic Year) विद्यार्थ्यांना एसटीचे (ST Bus) पास थेट शाळा-महाविद्यालायांत उपलब्ध करून देण्याचा निर्णय परिवहन महामंडळाने (ST Mahamandal) घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
नक्की वाचा : पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचा मोठा अपघात;मालगाडीची एक्सप्रेसला धडक,पाच जणांचा मृत्यू
एसटी प्रशासनातर्फे विशेष मोहीम
१८ जूनपासून राज्यात एसटी प्रशासनातर्फे ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींना आता एसटीचे मासिक पास थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी एसटी प्रशासनाला दिल्या आहेत.
अवश्य वाचा : विहिरीत लावलेल्या जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट; तीन जणांचा जागीच मृत्यू
सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण (ST Bus)
घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून ६६ टक्के इतकी सवलत दिली आहे, म्हणजे केवळ ३३ टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना एसटीमधून शालेय प्रवासासाठी मासिक पास काढता येतो. त्याचप्रमाणे शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. परंतु, विद्यार्थी-विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभा राहून पास घ्यावे लागत होते.
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना पाससाठी आता रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही. त्यांच्या शाळा-महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्याकडून संबंधित विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत. जेणेकरून त्यांचा वेळ वाया जाणार नाही.