ST Bus : नगर : प्रत्येक हंगामात विक्रमी उत्पन्न मिळवणाऱ्या नगर एसटी (ST Bus) आगाराला आषाढी एकादशी कालावधीत पंढरीचा पांडुरंगही पावला. ९ ते २१ जुलै दरम्यान पावणे दाेन लाख प्रवाशांनी नगर ते पंढरपूर (Pandharpur) लाभ घेतला. यातून नगर विभागाला सुमारे २ काेटी १४ लाख रुपयांचे उत्पन्न (Income) मिळाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत उत्पन्नामध्ये वाढ झाली असल्याचे विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी सांगितले.
नक्की वाचा: ‘मोदींना सत्ता आणायला छत्रपती लागतात,पण अरबी समुद्रात स्मारक होत नाही’- मनोज जरांगे
पंढरपूरला जाणाऱ्या एसटी बसेसमध्ये गर्दी
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भक्तांची संख्या दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने एसटी महामंडळाच्या नगर आगाराने बसेसद्वारे वाहतुकीचे नियोजन केले. विशेष व्यवस्था करून प्रवाशांना सुविधा पुरवण्यासाठी विशेष बसेसची सोय केली होती. या कालावधीत पंढरपूरला जाणाऱ्या एसटी बसेसमध्ये गर्दी राहिली.
अवश्य वाचा: अरेच्चा! शेतकऱ्याने शेळ्यांसाठी शिवला रेनकोट
सुरक्षा आणि सुविधा याबाबत विशेष लक्ष (ST Bus)
भक्तांच्या सोयीसाठी अतिरिक्त बसेसची सोय केली. गाड्यांचे वेळापत्रक भक्तांच्या सोयीसाठी पुन्हा संयोजित केले होते. यामुळे अनेक प्रवासी वेळेवर पंढरपूरला पोहोचू शकले. आगाराने प्रवासाची सोय, त्यांची सुरक्षा आणि सुविधा याबाबत विशेष लक्ष दिले. ९ ते २१ जुलै या कालावधीत एकूण २४० जादा एसटी बसेसचे नियोजन केले होते. आषाढी एकादशी काळात एसटी आगाराच्या प्रयत्नांना प्रवाशांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे..