ST Bus Strike : ऐन सणासुदीच्या ताेंडावर ‘लालपरी’ला ब्रेक; एसटी कर्मचाऱ्यांनी उपसले संपाचे हत्यार

ST Bus Strike : ऐन सणासुदीच्या ताेंडावर 'लालपरी'ला ब्रेक; एसटी कर्मचाऱ्यांनी उपसले संपाचे हत्यार

0
ST Bus Strike : ऐन सणासुदीच्या ताेंडावर 'लालपरी'ला ब्रेक; एसटी कर्मचाऱ्यांनी उपसले संपाचे हत्यार
ST Bus Strike : ऐन सणासुदीच्या ताेंडावर 'लालपरी'ला ब्रेक; एसटी कर्मचाऱ्यांनी उपसले संपाचे हत्यार

ST Bus Strike : नगर : एसटी कामगार (ST workers) संयुक्त कृती समितीच्या प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा संपाचे (ST Bus Strike) हत्यार उपसले आहे. आजपासून कामगारांनी संपाला सुरूवात केल्याने ऐन सणासुदीत एसटीची (ST Bus) सेवा विस्कळीत झाली आहे. राज्यातील विविध आगारांमध्ये काम बंद आंदाेलन (Stop work) पुकारण्यात आले आहे. 

अवश्य वाचा : जाती-धर्मावरुन द्वेष पसरवला तर गाठ माझ्याशी : सुजय विखे पाटील

आर्थिक प्रश्नांची सोडवणूक होत नसल्यामुळे नाराजी

एसटी कामगारांच्या आर्थिक व महत्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्यामुळे कामगारांमध्ये निर्माण झालेली नाराजी विचारात घेऊन एसटी महामंडळातील बहुतांशी संघटनांची संयुक्त कृती समिती स्थापन केली. या समितीद्वारे राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्याबरोबरच मागील वेतन वाढीतील फरक दूर करणे, महागाई भत्त्याची थकबाकीची रक्कम देणे, मागील करारातील त्रुटी दूर करणे, याबरोबरच शिस्त व आवेदन पद्धतीमधील बदल, मेडिकल कॅशलेस योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करणे या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलन केले जात आहे.

नक्की वाचा: शिवरायांचा पुतळा पडण्यात राजकीय व्यक्तींची चूक नाही : कालीचरण महाराज

ऐन गणेशोत्सवात गावी निघणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप (ST Bus Strike)

दरम्यान, नगर जिल्ह्यातील विविध आगारातून संपाची हाक दिल्याने आता एसटी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन लवकर संपले नाही, तर ऐन गणेशोत्सवात गावी निघणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप होऊ शकतो.