नगर : राज्य परिवहन मंडळ अर्थात एसटी (ST) कर्मचाऱ्यांची दिवाळी (Diwali) गोड होणार आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसाठी सरसकट ६ हजार रुपयांच्या बोनसची घोषणा केली आहे. एकटी कर्मचारी आणि अधिकारी या सर्वांना ६ हजार रुपयांचा बोनस (Bonus) मिळणार आहे. गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आला होता.
हे देखील वाचा : मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र पिंजून काढणार
शिंदे सरकारने मागच्या वर्षीच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांच्या बोनसमध्ये एक हजार रुपयांची वाढ केली आहे. एसटी संघटनांनी यंदा दिवाळीचा बोनस सरसकट १५ हजार रुपये देण्याची मागणी केली होती. मात्र, शिंदे सरकारकडून ही मागणी मान्य झालेली नाही. असे असले तरी बोनसमध्ये वाढ झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यांची दिवाळी काही प्रमाणात गोड होणार आहे.
नक्की वाचा : सरकारी कर्मचारी १४ डिसेंबरपासून संपावर; जुन्या पेन्शनसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा
आज वसूबारस असल्याने दिवाळीचा सणाला एकप्रकारे सुरुवात झाली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आर्थिक स्वरूपात दिवाळीची भेट दिली जाते. गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे प्रवासी संख्या घटल्याने एसटीला आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीतही महामंडळाकडून यंदा सरसकट अधिकारी व कर्मचारी वर्गाला ६ हजार रुपये दिवाळी भेट देण्यात येणार आहे. ही रक्कम लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक नवीन निर्णय घेतले. यातीलच महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीप्रमाणे यंदा दिवाळीचा बाेनस सरसकट १५ हजार रुपये देण्याची मागणी हाेती. मात्र, सरकारने एक हजार रुपयांची वाढ केली आहे. नगर जिल्ह्यातील अकरा आगारात एकूण साडेचार हजार कर्मचारी सध्या कार्यरत आहे. याचा यांना लाभ हाेणार आहे.