ST Bus Hike:लालपरीचा प्रवास महागला!आजपासून १५% भाडेवाढ

0
ST Bus Hike:लालपरीचा प्रवास महागला!आजपासून १५% भाडेवाढ
ST Bus Hike:लालपरीचा प्रवास महागला!आजपासून १५% भाडेवाढ

ST Bus Hike : सर्वसामान्य प्रवाशांसाठी हक्काचे साधन अशी ओळख असलेल्या लालपरीचा प्रवास आता महागला आहे. एसटी प्रवासाच्या (ST Travlling) भाडेवाढीला (Hike)मंजूरी देण्यात आली असून एसटीच्या तिकीटात १४.९५ टक्के दरवाढ करण्यात आली आहे. राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी ही माहिती दिली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बसेससह खासगी वाहनांचा प्रवास देखील महागणार आहे.

नक्की वाचा : अभिमानास्पद! प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर बीडची कन्या करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व

एसटीचे नवे दर आजपासूनच लागू (ST Bus Hike)

राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी एसटी दरवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यावर आता महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच राज्य परिवहन प्राधिकरणाची बैठक झाली. या बैठकीत एसटी बसच्या तिकीट दरवाढीला मंजुरी देण्यात आली. बैठकीत झालेल्या चर्चेनुसार एसटीच्या तिकीटात १४.९५ टक्के दरवाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह मुंबईमधील प्रवाशांसाठी हे नवे दर लागू होणार आहेत. त्यामुळे सर्व सामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. हे नवे दर आजपासूनच लागू होणार असल्याचे प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे.

अवश्य वाचा : महाकुंभात व्हायरल झालेली मोनालिसा कोण ?

मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षाची भाडेवाढ होणार  (ST Bus Hike)


राज्य परिवहन खात्याने एसटी दरवाढ केल्यानंतर दुसरीकडे मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षाची देखील भाडेवाढ होणार आहे. गेल्या काही वर्षापासून टॅक्सी आणि रिक्षा यांची भाडे वाढली झाली नाही.  त्यामुळे ३ रूपयांनी भाडेवाढ करण्याची मागणी होती. ही भाडेवाढ होणं गरजेचं आहे नाहीतर आमचं जगणं मुश्किल होईल असं टॅक्सी रिक्षा चालकांचे म्हणणे आहे. त्यानुसार आता टॅक्सी आणि रिक्षाचाही प्रवास महागला आहे. टॅक्सीचे सध्याचे दर हे २८ रुपये आहेत.आता नव्या दरवाढीनुसार ते ३१ रुपये होतील. तसेच रिक्षाचे सध्याचे दर हे २३ रुपये असून नव्या दरवाढीनुसार २६रुपये मोजावे लागणार आहेत. दोन फेब्रुवारीपासून ही भाडेवाढ होईल,अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here