Stamp Duty:मोठी बातमी!स्टॅम्प पेपरच्या दरात पाच पट वाढ

0
Stamp Duty: मोठी बातमी!स्टॅम्प पेपरच्या दरात पाच पट वाढ
Stamp Duty: मोठी बातमी!स्टॅम्प पेपरच्या दरात पाच पट वाढ

नगर: राज्य सरकारच्या उत्पन्नाच्या महत्त्वाचा स्त्रोतांपैकी एक असलेल्या मुद्रांक शुल्कात वाढ (Stamp Duty Increase) झाली आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाने (State Cabinet) याबाबत सोमवारी (ता.१४) निर्णय घेतला होता. त्यामुळे १०० रुपयांना मिळणारा स्टॅम्प पेपर आता ५०० रुपयांना मिळणार आहे.

नक्की वाचा : विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर,देवेंद्र फडणवीस यांची एका शब्दात प्रतिक्रिया

वार्षिक महसुलात वाढ होण्याची शक्यता (Stamp Duty)

राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी महाराष्ट्र मुद्रांक कायदा, १९५८ च्या अनुसूची १ मध्ये सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. कागदपत्रांच्या प्रकारांमध्ये साधेपणा आणि अचूकता आणण्यासाठी आणि व्यवसायात सुलभता आणण्यासाठी हे केले जात असल्याचे एका सरकारी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. यातून वार्षिक १०० ते १५० कोटी रुपयांनी महसूल वाढण्याची अपेक्षा आहे

अवश्य वाचा : भाजपकडून लाडकी बहीण योजनेची जोरदार जाहिरात,मात्र मुख्यमंत्री शब्द वगळला

 स्टॅम्प पेपरसाठी मोजावे लागणार ५०० रुपये  (Stamp Duty)

राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या मुद्रांक शुल्कवाढीनंतर ५०० रुपये स्टॅम्प पेपरसाठी मोजावे लागणार आहेत. खरेदी खत, हक्क सोडपत्रासाठी आता ५०० रुपये मुद्रांक शुल्क मोजावे लागणार आहे. यात प्रतिज्ञापत्र, करारपत्र, विविध परवाने आदींसाठी लागणारे १०० रुपयांचे स्टॅम्प पेपर ऐवजी आता ५०० रुपयांचा स्टॅम्प पेपर द्यावा लागणार आहे. ही नवी शुल्क वाढ सोमवार (ता.१४) पासून लागू झाली आहे. त्यामुळे आता नागरिकांना पाच पट अधिक शुल्क द्यावा लागत आहे.यामुळे नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here